- माधुरी पेठकर.जीवनशैली आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे जशी जीवनशैली तसं आरोग्य हे समीकरणच झालं आहे. सध्या अनेकांना पचनासंबंधीच्या विकारांना तोंड द्यावं लागतं. त्याचा थेट संबंध त्यांचं खाणं-पिणं, त्यांची कामाची पध्दत, त्याची उठण्या झोपण्याची सवय याच्याशी आहे. सध्या कामाचा ताण वाढला आहे. कामासाठी वेळ पुरत नसल्यानं व्यायामासारख्या महत्त्वाच्या आणि आवश्यक क्रियेसाठी दिवसातले पंधरा वीस मीनिटं देणंही अनेकांना जमत नाही. एकाच जागी बसून काम करण्याची कामं वाढली आहेत. पाणी कमी प्यायलं जातय. तसेच आहारात तंतूमय पदार्थ कमी झालेत आहेत आणि मैद्याच्या पदार्थांचं प्रमाण वाढलं आहे. या सर्वांचा ताण पचनसंस्थेवर पडून पचनक्रिया बिघडू लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेकांना पोटफुगी, पोटात गॅस धरणे, अस्वस्थ वाटणे यासारखे त्रास होत आहे. हे त्रास कमी करण्यासाठी औषधांसोबतच आपले आहारातील पदार्थही खूप मदत करतात. ज्यांना असे त्रास आहेत त्यांनी आपल्या आहारात पुढील पदार्थांचा समावेश अवश्य करावा.पचनक्रिया सुधारणारे पदार्थ1) योगर्ट
योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिलस, अॅसिडोफिल्स आणि बायफिडस नावाचे जीवाणू असतात. हे जीवाणू पोटात वायू धरण्यास प्रतिरोध करतात. पोटफुगी होवू देत नाही. योगर्टमध्येही गोड नसलेलं योगर्ट रोज जेवणानंतर घेतल्यास फायदा होतो.
2) हळद
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पचनासंबंधीच्या कोणत्याही आजारावर उत्तम काम करते ती हळद. हळदीमुळे पोटात बाइल या रसायनाच्या निर्मितीस चालना मिळते. हे रसायन आहारातील फॅटसचं पचन सुधारण्यास मदत करत. हळदीमध्ये दाह कमी करण्याचा गुण असतो. त्याचाच फायदा पोटात आग होण्यासारख्या त्रासावर होतो. त्यामुळे पाण्यात थोडी हळद मिसळून घेतल्यास त्याचा फायदा होतो
3) लिंबू पाणी
कोमट पाण्यात लिंबू पाणी पिणं ही उत्तम सवय आहे. याचा थेट फायदा आतड्यांच्या स्वच्छतेसाठी होतो. आतडे स्वच्छ असले की पोटात वायू धरण्याची समस्या आपोआपच कमी होते. पोट फुगी आणि त्यातून येणार अस्वस्थपणा दूर होतो.
4) बडीशेप
बडीशेपमध्य असलेल्या तेलामुळे अन्नघटकांच्या पचनास सुलभता येते. जेवणानंतर बडीशेपाचं चर्वण केल्यास गॅस आणि पोटफुगीचा त्रास होत नाही.
5) काकडी
काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिका आणि क जीवनसत्त्वाचा समावेश असतो. काकडी खाण्यामुळे पोटात पाणी साचून राहात नाही. त्यामुळे पोटफुगी होत नाही.
6) सेलरी
सेलरीच्या पानांमध्ये मोट्या प्रमाणात पाणी असतं. हे पाणी शरीरातील द्रव पुढे ढकलण्यास मदत करतं. त्यामुळे पोट फुगत नाही.
7) केळीखाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आलं तर पोटात हमखास गॅस धरतात. पण केळामध्ये असलेल्या पोटॅशिअममुळे सोडिअमचे नकारात्मक परिणाम कमी होतात. आणि शरीरात पोटॅशिअम आणि सोडियमचं संतुलन राहातं. तसेच केळ हे पचनास मदत करतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. म्हणून रोज एक तरी केळ खावं.
8 ) हिंगजेव्हा पोट फुगून अस्वस्थ व्हायला होतं, गॅसेस होवून पोट दुखायला लागतं तेव्हा एक चिमूटभर हिंग घ्यावा. एक ग्लास गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यायल्यास पोटदुखी थांबते आणि गॅसेस कमी होतात.9) अननसहे उष्णकटिबंधीय फळात 85 टक्के पाणी असतं. तसेच यात पचनास मदत करणारं ब्रोमलेन सारखं विकर अर्थात इन्झाएम्स असतात. हे विकर पचनमार्ग स्वच्छ ठेवतात.
10 ) पालकपालकातून पोटामध्ये भरपूर प्रमाणात तंतू जातात. ज्याचा परिणाम म्हणजे पोट स्वच्छ राहातं. गॅसेस आणि पोटफुगीचा त्रास पालक खाल्ल्यानं होत नाही. फक्त पालक नीट स्वच्छ केलेला हवा आणि नीट शिजवलेला हवा. अर्धवट शिजलेला पालक पोटास त्रास देवू शकतो.