सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाला हेल्दी आहार घेणं शक्य होत नाही. परिणामी आरोग्याच्या अनेक समस्यांसोबतच वजनही वाढू लागतं. अशातच अनेक उपाय करूनही वजन काही आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. अनेक लोकांमध्ये लठ्ठपणाची लक्षणं दिसून येतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक तासंतास जिममध्ये घालवताना दिसतात किंवा डाएटिंग करताना दिसतात. वजन कमी होतचं पण आरोग्यवर याचे अनेक गंभीर परिणाम होतात. शरीराला आजार आणि लठ्ठपणापासून दूर ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता फार महत्त्वाचा ठरतो. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये जर काही निवडक पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होईल.
नाश्त्यासाठी हे पदार्थ ठरतात फायदेशीर
सकाळच्या नाश्त्यामध्ये जंक फूडचा समावेश न करता हेल्दी पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या आरोग्यासोबतच वजनही स्थिर राहण्यास मदत होईल. सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश केल्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळण्यास मदत होते आणि मेटाबॉलिज्म वाढतं. त्यामुळे वाढलेलं वजन कमी होण्यास मदत मिळते. परंतु त्यासाठी तुम्हाला या पदार्थांचा साकळच्या नाश्त्यामध्ये नियमित समावेश करणं आवश्यक असतं.
प्रोटीनने परिपूर्ण दलिया
पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये दलियाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. गव्हापासून तयार झालेल्या दलियामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. त्यामळे पोटाच्या समस्या दूर होण्यासोबतच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. दलिया आणखी स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचादेखील वापर करू शकता.
दूधासोबत कॉर्नफ्लेक्स
दूधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्किम्ड किंवा टोंड मिल्कचा वापर करू शकता. स्किम्ड किंवा टोंड दूधामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. परंतु यामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये दूधाचा समावेश केल्यामुळे दिवसभराच्या धावपळीच्या कामामध्ये शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
ऊर्जादायी केळी
सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही केळ्याचा समावेश केला तर तुमचं वजनही वाढत नाही आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तुम्ही केळ्याचे शिकरण तयार करून खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि मधाचाही समावेश करू शकता.
चणे आणि सलाड
काळे चणे आणि काबुली चण्यांपासून तयार करण्यात आलेल्या सलाडचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आरोग्यदायी पोहे
सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खाणं म्हणजे एकदम हेल्दी नाश्ता करणं होय. पोहे तयार करण्यासाठी फार कमी वेळ लागतो तसेच त्यामुळे पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यासही मदत होते. पोटभर पोहे खाल्यामुळे बराचवेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे सतत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.