हिवाळ्यात शरीराला ऊब देत असलेले पदार्थ खाण्याची गरज असते. वातावरणात गारवा वाढल्यानंतर आहारात सुद्धा बदल व्हायलाच हवा. हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेक घरांमध्ये मेथीचे लाडू तयार केले जातात. अनेकांना मेथीचे लाडू खायला अजिबात आवडत नाही. पण मेथीच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याशिवाय डाएटवर नियंत्रणही ठेवता येतं. आज आम्ही तुम्हाला मेथीचे लाडू तयार करण्याची योग्य पद्धत आणि आरोग्याला होणारे फायदे याबाबत सांगणार आहोत.
मेथीचे लाडू तयार करण्याची पद्धत :
साहित्य :
1/2 कप तूप
1 कप गव्हाचं पीठ
1 टेबल स्पून मेथी
2 टी स्पून बडिशेप
एक छोटा चमचा सुंठाची पावडर
¾ कप गुळ किंवा साखर
कृती :
- एका कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ग्व्हाचं पिठ टाकून मंद आचेवर भाजून घ्या.
- जवळपास अर्धा तास भाजल्यानंतर पिठ सोनेरी रंगाचं दिसू लागले. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या. जर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले नाही आणि तुम्ही यामध्ये साखर एकत्र केली तर मिश्रण कोरडं होईल.
- एका दुसऱ्या कढईमध्ये मेथी, बडिशेप टाकून भाजून नंतर मिक्सरमध्ये बारिक करा.
- जेव्हा पिठाचं मिश्रण पूर्णपणे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर आणि बारिक केलेलं मिश्रण एकत्र करा. आता सुंठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हाताने लाडू वळून घ्या.
- तुम्हा या मिश्रणामध्ये ड्राफ्रुट्सही वापरू शकता.
- एका एयर टाइट कंटेनरमध्ये लाडू व्यवस्थित बंद करून ठेवा.
- मेथीचे लाडू चार ते पाच आठवड्यांपर्यंत चांगले राहू शकतात.
भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण
फायदे
मेथी, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं, हृदयाशी निगडीत आजारांसोबतच डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले फायबर, अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.
हिवाळ्यात गुणकारी मेथीच्या 'या' ५ चविष्ट रेसेपीज् ट्राय कराल; तर आरोग्याच्या तक्रारी विसराल
अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.
मेथीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.