आपण दररोज जेवण जेवत असतो किंवा नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत असतो. पण कधी विचार केलाय का? जे जेवणं तुम्ही दररोज खाता ते कितपत पौष्टिक असतं? किंवा तुम्हाला हे माहीत आहे का, शरीराला कोणती पोषक तत्व आवश्यक असतात? सध्या फास्टफूड्स, जंकफूड आणि बाहेरील खाण्यामध्ये ती पोषक तत्व नसतात, जी आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक असतात. यामुळे अनेक लोकांना लाइफस्टाइलशी निगडीत आजार जसं डायबिटीज, कॅन्सर, फॅटी लिव्हर, हार्ट अटॅक इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही या सर्व समस्यांपासून निरोगी राहण्याची इच्छा असेल तर तुमच्या आहारात या 7 पौष्टीक तत्वांचा अवश्य समावेश करा.
प्रोटीन :
प्रोटीन आपल्या शरीरातील पेशी तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. याव्यतिरिक्त प्रोटीन तुमची त्वचा आणि मांसपेशींसाठी देखील फायदेशीर ठरतं. प्रोटीनच्या 22 प्रकारांपैकी आपलं शरीर 14 प्रोटीन तयार करू शकतं आणि इतर 8 प्रोटिन्सला अॅमिनो अॅसिड म्हणून ओळखलं जातं. जे फक्त जेवणामधून प्राप्त केलं जाऊ शकतं. बॅलेन्स डाएटमध्ये या 8 प्रकारचे प्रोटिन्स असणं आवश्यक असतं. त्यामुळे मासे, मांस, अंडी, पनीर यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये अॅमीनो अॅसिड असतं.
पाणी :
आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक असतं. मानवी शरीरामध्ये जवळपास 70 टक्के पाणी असतं. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं. पाणी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे दररोज जेवणा सोबतच पाणी किंवा द्रव्य पदार्थ घेणं फायदेशीर ठरतं. तुम्हाला दररोज कमीतकमीत 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं.
कार्बोहाइड्रेट्स :
कार्बोहाइड्रेट संतुलित आहारासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. शरीरातील सर्व अवयव, पेशी आणि स्नायूंसाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. जे कार्बोहायड्रेटपासून तयार झालेले असतात. कार्बोहाइड्रेट धान्य, फळं, भाज्या आणि फळभाज्यांमध्ये असतात. कँडी, पेस्ट्री, कुकीज आणि पेय पदार्थांपासून तुम्हाला कार्बोहाइड्रेट्स मिळतात, ज्यांमध्ये अनेक हानिकारक तत्व असतात. त्यामुळे चांगल्या कार्बोहायड्रेटचं सेवन करणं आवश्यक असतं. एका मोठ्या माणसाला जवळपास 45 ते 65 टक्के कॅलरी कार्बोहायड्रेट आवश्यक असतात.
फायबर :
फायबरमुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर पोटाच्या समस्या दूर होण्यासही मदत मिळते. फायबर आतडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतं. याव्यतिरिक्त शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. फायबर युक्त खाद्यपदार्थ बद्धकोष्ट, जायबिटीज, अस्थमा, हृदयरोग आणि कॅन्सर दूर घालवण्यासाठी मदत करतं.
मिनरल्स :
मिनरल्स म्हणजेच खनिज तत्व जसं कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, सोडियम इत्यादी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. अशी खनिजं जी शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असतात ती दररोज शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी मदत करत असतात. झिंक, सेलेनियम आणि कॉपर यांसारखी खनिजं शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करण्याचं काम करतात.