शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खाण्यापिण्याच्या गोष्टी : ही थाळी खायची?- दहा हजार रुपये मोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:44 AM

दिवे, आकाशकंदील, रांगोळ्या.. ही दिवाळीशी संबंधित गोष्टींची यादी फराळ आणि मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळी आता फक्त भारतीयांचा सण राहिला नाही.

दिवे, आकाशकंदील, रांगोळ्या.. ही दिवाळीशी संबंधित गोष्टींची यादी फराळ आणि मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळी आता फक्त भारतीयांचा सण राहिला नाही. जगभरातले अनेक देश दिवाळीत रोषणाईने उजळून निघतात. अमेरिकेत टेक्ससमधल्या ह्युस्टन भागात एक महाप्रचंड दिवाळी मेळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात हजारो लोक सहभागी झाले आहेत. भारतीय  अन्नपदार्थांची रेलचेल इथे आहे. यावर्षीच्या मेळ्याची थीम आहे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.

न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते गेली काही वर्षे अमेरिकेत भारतीय मिठाई या काळात मोठ्या प्रमाणावर विकली जाते. केशर बर्फी, चॉकलेट बर्फी, मलई सँडविच, काजू कतली, काजू रोल, जिलेबी, पेठा, पेढे, रसगुल्ले, लाडू या आणि अशा अनेक मिठायांनी दुकाने सजली आहेत. काही ठिकाणी मिठाई विकत घेण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. सुखदेव बावा यांचे महाराजा स्वीट्स हे न्यूयॉर्क शहरातल्या क्वीन्स भागातले गजबजलेले दुकान. १९८१ साली अमेरिकेत स्थलांतरित झालेले बावा आधी टॅक्सी चालवायचे. नंतर त्यांनी मिठाई विकायला सुरुवात केली. आज त्यांच्या दुकानात ऐंशीपेक्षा जास्त प्रकारच्या मिठाई मिळतात. नव्या मिठाईच्या शोधात बावांचे सहकारी भारताला भेटी देतात. 

इंग्लंडमधल्या दिवाळीची मौजच वेगळी आहे. खुद्द ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरापासून ते छोट्या-छोट्या गल्ल्यांत दिवाळीनिमित्त खास खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. इथे घसिटाराम, हल्दीरामसारखी दुकाने आहेतच; पण त्याचबरोबर प्रत्येक भागात मिठाई मिळतात. दिवाळी निमित्ताने रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे लंडनवासीयांना आवडते. उत्तमोत्तम भारतीय उपाहारगृहे ब्रिटनमध्ये आहेत हे त्यामागचे महत्त्वाचे कारण. यातली काही उपाहारगृहे उच्चभ्रूंसाठी आहेत तर काही सर्वसामान्यांसाठी. 

जामावार नावाच्या उपाहारगृहात खास दिल्ली स्पेशल थाळी आहे. किंमत दहा हजार रुपये! ढिशूम नावाच्या उपाहारगृहाच्या शाखांमध्ये मुंबई स्पेशल गोष्टी आहेत आणि सामान्यांनी दिवाळी गेट टुगेदर्ससाठी ढिशूमला पसंती दिली आहे.

भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारbhalwankarb@gmail.com

टॅग्स :foodअन्न