- वृंदा दाभोलकर( खाद्यसंस्कृती अभ्यासक)
ताटात वरण-भात, भाजी-पोळी बरोबर लोणचे आणि चटणी हे दोन पदार्थ जेवणात रंगत आणतात. चटण्यांचा विषय निघाला की प्रत्येक खवय्या हळवा होतो. शिवाय महाराष्ट्रात प्रांतोप्रांतीच्या चटण्यांना चव आहे. अशाच काही चटण्यांची ही माहिती...
चाटण या शब्दावरून आपल्याला मिळालेला शब्द म्हणजे चटणी. आपल्या जेवणाच्या पानातली डावी बाजू जितकी भक्कम गृहिणींना बाकी स्वयंपाकाचं जरा टेन्शन कमी येतं. चटणी भाकरी, चटणी पाव, आंबोळी चटणी, इडली चटणी किंवा चटणी पोळी हे तर अगदी हुकमी खाणं. पावसाळ्यात, थंडीच्या दिवसात गरम गरम पदार्थांबरोबर चटणी असेल तर त्या पदार्थाला चार चाँद लागतात. आपला सगळ्यांचा आवडता वडापाव याच्याबरोबर हिरवी, लाल, गोड चटणी हवीच. सोलापूरची शेंगदाणा चटणी किंवा कोल्हापूरला मिळणारी लाल चटणी जीला ठेचा म्हणतात, खवय्यांसाठी पर्वणी असते.
लसूण तीळ चटणीकृती - तीळ एका कढईमध्ये मंद आचेवर हलके भाजून घ्यावे.- त्याच कढईत दाणे आणि सुकं खोबर खरपूस भाजून घ्यावे.- दोन्ही थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये जीर, लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि मीठ घालून मिक्सर वर व्यवस्थित बारीक वाटून घ्यावं.- शेंगदाणे, खोबरं असल्याने वेगळ्या तेलाची गरज भासत नाही आणि खाताना चटणी कोरडी वाटल्यास त्यात दही किंवा कच्च तेल, तूप घालून खाता येते.
लसूण तीळ चटणीसाठी साहित्य- तीळ - १ वाटी - शेंगदाणे दाणे - अर्धी ते पाऊण वाटी.
डोश्याची लाल चटणीलाल चटणीसाठी साहित्यn दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरूनn एक मध्यम कांदा चिरलेलाn ५/६ चमचे चिंचेच पाणी,किंवा १ चमचा आमचूर पावडर n काश्मिरी लाल मिरची पावडर २ चमचे n मीठ, जिरं १/२ चमचा, १/२ चमचा हळद, १०/१२ कढीपत्त्याची पानं, २ चमचे तेल (मोहरीचे वापरू शकत असाल तर)n उडदाची डाळ १ चमचा, फोडणीसाठी १/२ चमचा मोहरी.- सुकं खोबर - अर्धी वाटी- लसूण - १२ ते १५ पाकळ्या - मीठ - चवीनुसार, सैंधव मीठ वापरू शकता.- जीरं - अर्धा चमचा- लाल तिखट - १ -१/२ चमचा
कृती - कढईत तेल गरम करा. आता कढईत जिरे टाका. जिरे तडतडले की कांदा घाला. कांदा रंग बदलू लागला की त्यात टोमॅटो घाला. यानंतर हळद,लाल मिरची पावडर,मीठ, कढीपत्ता घाला. - आता ते शिजेपर्यंत सुमारे १०-१२ मिनिटे शिजवा. आता त्यात चिंचेचे पाणी घाला. गॅस बंद करून थंड होऊ द्या. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर एका भांड्यात काढा.- फोडणी च्या कढईत पहिल्यांदा तेल गरम करून त्यात उडदाची डाळ घालून ती सोनेरी रंगाची झाली की त्यात मोहरी घालून गरम गरम फोडणी त्या चटणीवर घाला.- डोसा, भाकरी, पोळी बरोबर ही चटणी ट्राय कराच.