पावसाळ्यात भूक जास्त लागते. त्यात तळणीचे पदार्थ खावेसे वाटत असले तरी ते पचायला जड म्हणून ठराविक प्रमाणात खावे लागतात. आयुर्वेदानुसार दमा, कफ व रक्ती मूळव्याध इ. व्याधींवर ही अळीव गुणकारी आहे. यातील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो. म्हणून पावसाळ्यात छोट्या मोठ्या भुकेसाठी तोंडी लावायला काय करावे याचा विचार करत असाल तर झटपट होणारे पौष्टिक आळिवाचे लाडू नक्की करून बघा. त्याची सोपी रेसेपी देत आहेत वैदेही भावे. (स्रोत: चकली ब्लॉगस्पॉट)
साहित्य:४ कप नारळाचा चवदिड कप गूळ१/२ कप अळिव१५ बदाम, सोलून पातळ काप३ ते ४ टेस्पून चारोळी३ ते ४ टेस्पून बेदाणे१/२ टिस्पून जायफळ पूड
कृती:१) अळीव नारळाच्या पाण्यात किमान २ ते अडीच तास भिजत ठेवावे.२) कढई गरम करून त्यात भिजवलेले अळिव, खवलेला नारळ, आणि गूळ घालून मिक्स करावे. मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईस्तोवर ढवळावे.३) मिश्रण घट्टसर झाले कि त्यात बदाम, चारोळी, बेदाणे आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे. मिश्रण गरमसर असतानाच लाडू वळावेत.
टीप:१) जायफळऐवजी वेलची पूडही वापरू शकतो.२) जर नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात अळीव भिजवले तरी चालतील.