शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Food Recipe: बापरे! भज्यांचे एवढे प्रकार? सुगरणींच्या पाककलेची कमाल; यापैकी तुम्ही कोणकोणते भजी प्रकार करता?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 1:59 PM

Food Recipe: पावसाळा आणि भजी हे आपलं आवडतं समीकरण, मग कांदे आणि बटाटे भजीवरच ताव का मारायचा? वाचा भजीचे आणखी प्रकार... 

>> माधुरी घाटे-हळकुंडे 

पावसाळा आला आहे, वेगवेगळ्या भज्यांच्या पर्यायांची उजळणी करावी म्हटलं.

- बटाटा भजी- कांद्याची खेकडा भजी- कांद्याच्या रींग्ज - कांद्याची बोंडा भजी- गोल भजी- भेंडीची भजी- कोबीची भजी- फ्लॉवरची भजी (तुरे एकदा उकळत्या पाण्यातून काढायचे)- अळूच्या पानांची भजी- पालकाची भजी (अख्खी पानं किंवा बारीक चिरून)- मिरचीची भजी- पालक मेथीची भजी- भरलेल्या मिरचीची भजी- गिलक्यांची भजी- ब्रेडची भजी- ओव्याच्या पानांची भजी

अजून अनेक पदार्थांची अनेक प्रकारे भजी बनतात. मूगडाळ, चणाडाळ भिजवून, कच्च्या केळ्यांची, सुरणाची, बेबी कॉर्न इत्यादी इत्यादी. मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या दारात 'मायाळू' नावाचा वेल होता. गुलाबी देठांचा. त्याचीही भजी केली जात.

आज केलेल्या कोणत्याही प्रकारात खाण्याचा सोडा वापरलेला नाही. मूळात आम्ही घरात खाण्याचा सोडा हा प्रकार ठेवतच नाही. भजी कुरकुरीत, खमंग आणि टमटमीत बनण्यासाठी दोन नामी युक्त्या आहेत :

1. बेसनात एक लहान चमचा (tsp) तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ घालायचं2. बेसनात हळद, तिखट, ओवा, आवडीप्रमाणे कुटलेले धणे किंवा तीळ, कोथिंबीर, मीठ कालवल्यावर तळणीचं कडकडीत तापलेलं दोन चमचे तेल त्यावर घालायचं. फक्त तेल टाकताना चरचरून आवाज येण्याएवढं गरम असायला हवं. बास, हे दोन उपाय म्हणजे खाण्याच्या सोड्याला कायमची सुट्टी आणि भजी फर्मास !

'न भूतो न भविष्यती' एवढी भजी आज एका दिवसात एकदम केली. शेवटचा घाणा निघेपर्यंत त्या वासाने मी भज्यांच्या दुकानात कामाला आहे असं वाटायला लागलं होतं. प्रत्येक प्रकारची 4-5 भजी करता करता संध्याकाळी घराबाहेर भज्यांची गाडी टाकावी लागते की काय इतकी भजी झाली. सगळी भजी मांडायला नेहेमीचं ताट पुरेना.

आज सकाळपासून जरा उघडीप होती. एरवी पावसाचे ढग दिसले तरी आमचा छोटा आग्या वेताळ "भजी भजी" करत नाचत सुटतो. आज उलटं झालं...भजी केली आणि पाऊस आला. 

टॅग्स :foodअन्न