(Image Credit- archna's kitchen)
हिवाळ्यात अनेक पालेभाज्या बाजाारात दिसायला सुरूवात होते. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे सगळ्यांनाच रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहार हवा असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन अनेकांना कंटाळा येतो. पालेभाजी म्हटलं तरी कपाळावर आठ्या येतात. मेथीची भाजी, पालकाची भाजी तुम्ही नेहमीच खात असाल आज आम्ही तुम्हाला मेथीचा वापर करून कोणत्या चविष्ट चवदार रेसीपीज करता येतील, हे सांगणार आहे. जेणेकरून घरातील लहानांसह मोठ्यांनाही एक वेगळी चव चाखायला मिळेल. तसंच पौष्टीक घटकांमुळे शरीरसुद्धा निरोगी राहिल. या रेसीपीज तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं साहित्य सांगणार नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही चविष्ट पदार्थ तयार करू शकता.
१) मेथीच्या भज्या
२) मेथी पराठा
३) मेथी मुठीया
४) मेथी वडी
५) मेथीची भाजी