स्वयंपाक करण्यापासून ते चिप्स, पापड, पुरी तळण्यापर्यंत तेलाचा पुरेपूर वापर होतो. सणासुदीला विशेषतः तेलाचा वापर जास्त होतो. बऱ्याचदा स्वयंपाकाच्या शेवटी, कढईत तेल शिल्लक राहते जे आपण पुन्हा स्वयंपाकासाठी वापरतो. परंतु तज्ञांच्या मते, एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे हानिकारक ठरू शकते. कितीही झाले तरी एवढे तेल फेकणे जीवावर येते, अशा वेळी तेल लागेल तेवढेच काढणे हा पहिला पर्याय असू शकतो आणि मग उरलेले थोडेसे तेल घरातील इतर गोष्टींसाठी कसे वापरायचे या पर्यायाबद्दल जाणून घेऊ.
लेदर फर्निचरच्या स्वच्छतेसाठी
फर्निचर पॉलिश करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी उरलेले तेल वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी प्रथम तेल गाळून दुसऱ्या डब्यात ठेवा. गाळलेले तेल कापडावर लावा. आता हे कापड चामड्याच्या पृष्ठभागावर घासून स्वच्छ करा. तेल चामड्याला मॉइश्चरायझ करण्याचे आणि भेगा बरे करण्याचे काम करते आणि चकाकी देते.
भांडी गंजण्यापासून वाचवा
अनेकदा लोखंडी अवजारे, भांडी वगैरे गंजतात. आपण लोखंडी तवा, कढई धुतो, काही वेळाने गंजतो. जर तुम्हाला लोखंडी वस्तू जास्त काळ सुरक्षित ठेवायची असतील तर त्यावर तेल लावा. त्यामुळे भांडी दीर्घकाळ गंजमुक्त राहतात.
कीटकनाशक फवारणी म्हणून वापरा
तेल फेकून देण्याऐवजी, आपण त्याच्या मदतीने कीटकनाशक फवारणी करू शकता. यासाठी तेल गाळून वेगळे करा. तेलात लिंबाचा रस आणि पाणी काही थेंब टाकून हे द्रावण बाटलीत भरून रोपांवर शिंपडा. रोपं कीटकमुक्त होतील.
कार साफसफाईसाठी वापरा
उरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही गाडीवरील डाग साफ करू शकता. यासाठी तेल गाळून एका भांड्यात वेगळे करा. आता पेपर टॉवेलवर तेल घ्या आणि डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळा. तेलाच्या मदतीने तुम्ही क्षणार्धात चिखल आणि घाणीचे डाग साफ करू शकता.
फोनची स्क्रीन स्वच्छ करा
फोन सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वजण स्क्रीन गार्ड वापरतो. स्क्रीन गार्ड काढून टाकल्यानंतर, तुम्ही फोनवरील गोंदाचे डाग काढून टाकण्यासाठी स्वयंपाक तेल वापरू शकता. यासाठी लिंट फ्री कापड तेलात बुडवून हलक्या हाताने चोळा.