जर शरीरातील व्हाइट ब्लड सेल्सची संख्या कमी झाली तर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. व्हाइट ब्लड सेल्सची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. एका निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये एक मायक्रोलीटर रक्तामध्ये 4,500 ते 11,000 व्हाइट ब्लड सेल्स असतात.
शरीरामधील पांढऱ्या रक्तपेशी white blood cells (WBCs) कमी झाल्याने शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे सतत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पांढऱ्या रक्तपेशींना ल्यूकोसाइट्ससोबत श्वेत पेशी असंही म्हटलं जातं. जाणून घेऊयात अशा काही पदार्थांबाबत ज्यामुळे व्हाइट सेल्स वाढण्यास मदत होते.
पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होण्याचं कारण
पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होण्यासाठी वायरल इन्फेक्शन, जन्मदोष, कॅन्सर, ऑटोइम्यून डिजीज, इतर गंभीर संक्रमण, अॅन्टीबायोटिक्स, खराब पोषण आणि अल्कोहोलिक पदार्थांचे अतिसेवन यांसारख्या गोष्टी कारणीभूत ठरतात.
पांढऱ्या पेशींची संख्या कमी होण्याची लक्षणं
पांढऱ्या रक्तपेशी कमी होण्याच्या लक्षणांमध्ये ताप येणं, थंडी वाजणं, सतत घाम येणं, सूज येणं आणि लाल चट्टे येणं, माउथ अल्सर, घशामध्ये खवखव होणं, श्वास घेण्यासाठी त्रास होणं यांसारखी कोणतीही लक्षणं दिसल्याने लगेचच डाएटमध्ये बदल करा.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शरीरातील पांढऱ्या पेशीं कमी झाल्यास पुढिल पदार्थांच्या सेवनाने त्यांची कमतरता भरून काढता येते. जाणून घेऊया पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पदार्थांबाबत...
लसूण
आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आलं आणि लसणाचा समावेश करा. या दोन्ही पदार्थांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक अशी सर्व पोषक तत्व आढळून येतात. तसेच आलं शरीरातील इन्पेक्शन कमी करण्यासाठीही मदत करतं.
बदाम
बदान शरीर आणि आरोग्यासाठी उत्तम मानलं जात. जर तुम्ही शरीरामध्ये व्हाइट ब्लड सेल्सचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयोगी ठरतं. दररोज 8 ते 10 बदाम खाणं फायदेशीर ठरतं.
हळद
जेवण तयार करण्यासाठी हळदीचा वापर करा. हळद अनेक मोठे आजार जसे ऑस्टियोपोरोसिस, ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांपासून बचाव करते. हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन तत्व एक उत्तम अॅन्टीऑक्सिडंट मानलं जातं.
आंबट फळं
सर्व आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरामध्ये व्हाइट ब्लड सेल्सचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे डॉक्टर्स अनेकदा आंबट फळं खाण्याचा सल्ला देतात. शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता उत्तम असते.