प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण असे चविष्ट मोदक तुम्ही घरच्या घरीही तयार करून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला सहज करता येणारी आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य -
- ४ वाट्या तांदळाची पिठी
- ३ वाट्या पाणी
- १ पळी तेल
- १ लहान चमचा साजूक तूप
- चवीपुरते मीठ
- १ वाटी ओलं खोबरं
- पाऊण वाटी चिरलेला गूळ
कृती -
एका भांड्यामध्ये तूप घ्या.
त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या.
प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.
थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका.
पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला.
नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची.
थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या.
उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.
त्यामध्ये खोबरं आणि गुळाचं शिजवलेलं सारण भरा.
त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.
त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.