घरोघरी बाप्पा विराजमान असून सगळीकडे त्याची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. पण तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही हटके पदार्थांचा विचार करत असाल तर तुम्ही तीळगुळाचे मोदक ट्राय करू शकता. जाणून घ्या तीळगुळाचे मोदक तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- गूळ एक वाटी
- तीळ एक वाटी
- कणीक दोन वाट्या
- तूप तळण्यासाठी.
कृती :
- सर्वात आधी कणीक मळून बाजूला ठेवा.
- एका कढईमध्ये तीळ भाजून घ्या.
- गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ एकत्र करा.
- हे मिश्रण एकजीव करून घ्यावं.
- कणकेचा गोळा घेऊन त्याची पार तयार करून त्यामध्ये सारण भरावे.
- त्याला मोदकाप्रमाणे आकार देऊन मोदक तळून घ्या.
- तीळ व गुळाचे तयार केलेले सारण थोडं गरम असतानाच मोदकाच्या साच्यामध्ये भरून त्याला मोदकाचा आकार द्या.
- बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी तीळगुळाचे लाडू तयार आहेत.