सण उत्सवांच्यावेळी गोड खायला सगळ्यांनाच आवडतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक हटके पदार्थ तयार केले जातात. खासकरून दूधापासून पदार्थ तयार करण्यात येतात. बाहेरून आणलेले पेढे, मावा मोदक अनेकदा भेसळयुक्त असू शकतात. हवीतशी चव त्याची येत नाही. पण घरच्याघरी तयार केलेल्या ताज्या मिठाईची मजा काही वेगळीच असते.
आज आम्ही तुम्हाला घरीच कलाकंद तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. दूध आणि पनीरपासून तयार करण्यात आलेली ही मिठाई पौष्टीक, आरोग्यदायी आहेच पण चवीलाही खूप छान आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही कलाकंद अत्यंत कमी वेळात तयार करू शकता.
साहित्य
क्रिम असलेलं दूध
किसलेलं पनीर
ड्रायफ्रुट्स
तूप
वेलची
कलाकंद तयार करण्याची कृती
१) एक कढई गॅसवर मंद आचेवर ठेवा. आता यामध्ये दूध एकत्र करा आणि काहीवेळाने त्यामध्ये किसलेलं पनीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्र करा.
२) जेव्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये तूप एकत्र करा आणि 3 ते 4 मिनिटांसाठी गॅसवर एकत्र करत राहा. तूप व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करा. ३) आता एका ट्रेला व्यवस्थित तूप लावून त्यामध्ये मिश्रण पसरवून घ्या.
४) आता तुम्ही ड्राय फ्रुट्सच्या मदतीने गार्निश करू शकता. ट्रे 2 ते 3 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर बाहेर काढून त्याच्या वड्या पाडा.
५) बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट कलाकंद तयार आहेत.