- सारिका पूरकर -गुजराथीपाणीपुरी...नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं! सर्वात आवडीचं स्ट्रीट फूड म्हटलं तरी चालेल.. बटाट्याचा लगदा, उकडलेले हरबरे, पुदीना-चिंच-पुदिनेच्या गोड आंबट आणि तिखट पाण्यानं टम्म भरलेली, वरून मलमल शेव भुरु भुरु न ही पुरी तोंडात टाकली की..अहाहा.. इतकी भन्नाट चव असूनही पाणीपुरीचे नाव जरी काढले तरी सध्या मात्र काही हेल्थ कॉन्शिअस खवय्ये पेचात पडतात.. खाऊ की नकोच्या यक्ष प्रश्नात अडकलेत. याला कारण पाणीपुरीशी संबंधित अस्वच्छता. तर अशा या सर्वांच्या लाडक्या पाणीपुरीला अस्वच्छेतेचं ग्रहण लागलंय खरं ! असं असूनही पाणीपुरीची गाडी समोर दिसल्यावर अनेकांना मोह आवरत नाही तो नाहीच. भारतीय खवय्यांचं पाणीपुरी प्रेम पाहून कर्नाटकातील मणिपाल तंत्रिनकेतनच्या विद्यार्थ्यांनी या समस्येवर आरोग्यदायी पर्याय शोधून काढलाय. तो म्हणजे, या विद्यार्थ्यांनी चक्क पाणीपुरीचे व्हेण्डिंग मशीनच तयार केलं आहे..आजवर आइस्क्रिमपासून पार सॅनिटरी नॅपिकनचे व्हेण्डिंग मशीन्सबद्दल माहिती होती पण आता चक्क पाणीपुरीचं व्हेण्डिंग मशीन तयार करु न या विद्यार्थ्यांंनी पाणीपुरीच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धेत या अनोख्या प्रकल्पास प्रथम क्रमांकानं सन्मानित करण्यात आलेय..नेमकं कसं आहे हे व्हेण्डिग मशीन?मशीनच्या पुढील बाजूवर कंट्रोल पॅनल्स आहेत तसेच स्मार्ट डिस्प्ले देखील ठेवण्यात आला आहे, जेणेकरु न मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी ते उपयोगी ठरेल. तर, हे व्हेण्डिंगा मशीन ते सर्वकाही करु शकते, जे एक पाणीपुरी विक्र ेता हातानं करतो. उदाहरणार्थ या मशीनची रचनाच अशी केली आहे, की एका भागात पाणीपुरीच्या पु-या साठवल्या की त्यातून त्या आपोआपच पुढे सरकवल्या जातात, त्यापूर्वी त्याला मध्यभागी भोकही हे मशीनच करते. त्यानंतर या पु-या बटाटा, हरभ-याचे सारण भरण्यासाठीच्या विशिष्ट भागात पोहोचवल्या जातात. हे देखील मशीनद्वारेच बरं का ! सारण भरून पुरी तयार झाली की लगेच हे मशीन पुरीला पाण्यामध्ये बुडवते व प्लेटमध्ये सर्व्ह करते. एक बटन दाबले की ही सर्व प्रक्रि या सुरु होते. कुठेही मानवी हाताचा स्पर्श नसल्यामुळे हायजीनबाबत बिनधास्त राहून मस्त पानीपुरी खाता येते.
पैज लावा आणि गंमत पाहा..पाणीपुरी व्हेण्डिंग मशीनची करामत एवढ्यावरच थांबत नाही.. तुम्ही रब ने बना दी जोडी पाहिलात ना ? त्यात शाहरूख आणि अनुष्कात कशी पाणीपुरी खाण्याची पैज लागते. दोघेही ताव मारता पाणीपुरीवर..तर अशी पाणीपुरीची पैज समजा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर लावली तर हे मशीन चक्क तुम्ही किती पाणीपुरीखाल्ल्या, तुमच्या मित्रानं किती खाल्या, याची मोजदाद करून मशीनवर त्याचे रेकॉर्डही ठेवते..आहे ना मॅजिक.. काही बेसिक इनपुट्स मशीनमध्ये घातले की मशीन लगेच त्याचं काम सुरु करतं.अशी सुचली कल्पनाया प्रोजेक्ट टीममधील साहस गेंबाली, नेहा श्रीवास्तव, करिश्मा अग्रवाल, सुनंदा सोमू हे चौघे एकदा पाणीपुरी खायला रस्त्यावरील विक्रेत्याकडे गेले. चार प्लेट्स पाणीपुरी त्यांनी आॅर्डर केली. परंतु, विक्रेत्याकडे भरपूर गर्दी होती. त्यापैकी या चौघांआधी आॅर्डर दिलेल्यांना तो हातानं एकेक पुरी फोडून, सारण भरु न, पाण्यात बुडवून प्लेटमध्ये देत होता. त्यामुळे या चौघांना त्यांची आॅर्डर मिळण्यासाठी खूप वाट पाहावी लागली होती .तेव्हा या चौघांच्या डोक्यात पाणीपुरी भराभर भरून देण्याची एक कल्पना चमकली. पाणीपुरी भरून देणं ही वारंवार करत राहावी लागणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच ती वेळखाऊ आहे. ही प्रक्रि या सोपी करण्यासाठीच आॅटोमोटेड करणं गरजेचं आहे. यामुळे स्वच्छता राखणं सोपं होईलच शिवाय पाणीपुरी जेथे हवी, जेव्हा हवी तिथे विकणं देखील सोपं होईल...मग काय या एका धाग्याच्या दिशेनं या चौघांनी सलग सहा महिने यासंदर्भात अभ्यास केला, नोंदी घेतल्या. व्हेण्डिंग मशीन आकार घेऊ लागले.पाणीपुरीला करायचेय ग्लोबल!या अनोख्या संकल्पनेबाबत या टीममधील एक साहस गेंबाली म्हणतो, ‘पाणीपुरी खरंतर इतका भन्नाट चाट पदार्थ आहे की त्याची ओळख जागतिक स्तरावर करु न द्यायला हवी असं मला वाटत होतं. शिवाय अनेक भारतीय सध्या परदेशात वास्तव्यास असतात. ते देखील पाणीपुरी मिस करतच असतील ना ? त्यांच्यामाध्यमातून जागतिक स्तरावर पाणीपुरीला एक टेस्टी चाट म्हणून ओळख मिळवून देता येईल. त्यादृष्टीनेही हे मशीन उपयुक्त ठरावं असा विचार करूनच काम सुरु केलं.