- मास्टरशेफ अजय चोप्रा
गुढीपाडवा म्हटलं की चिभेवर रेंगाळू लागते ती श्रीखंडाची चव. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त मास्टरशेफ अजय चोप्रा यांनी खास श्रीखंड चीज केक तयार केला आहे. पारंपरिक रेसिपीला मॉर्डन लूक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे. श्रीखंड आणि चीज याचे मिश्रण असलेला हा केक खवय्यांच्या पसंतीस उतरेल.
श्रीखंड चीज केक
बेससाठीसाखर १०० ग्रॅमकुरमुरे ७० ग्रॅम
चीज केक साठी३०० ग्राम सॉफ्ट क्रीम चीज मूळ फिलाडेल्फिया३०० ग्राम व्हिट क्रीमदीड कप दाणेदार साखर१/३कप लिंबाचा रस१ टेस्पून कॉर्नफ्लॉवर१ ½ टिस्पून वेनिला अर्क१ ½ टीस्पून लिंबू असोशी¼ - दीड टिस्पून केशर, वरीलप्रमाणे निर्देशित केले
श्रीखंडासाठीदही १ किलोसाखर ५०० ग्रॅमवेलची पूड २५ ग्रॅमकेशर १० स्प्रिॅग
कृतीमलाईमध्ये क्रिम चिज टाकून मिश्रण एकजीव करा. श्रीखंडासाठी लागणारं साहित्य एकत्र करून मिश्रण नीट एकत्र करा. नंतर श्रीखंड व तयार चिज एकत्र करा. त्यामध्ये साखरेचा पाक, कुरमुरे एकत्र करून मिश्रण तयार करा. बेस सेट झाल्यानंतर एकत्र करा.