(Image Credit : HungryForever)
उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात. पण अशातच आपल्यापैकी अनेकांना चवीशी अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. अशातच आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम ऑप्शन ठरते लस्सी. दह्यापासून तयार करण्यात आलेली लस्सी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. लस्सी प्यायल्याने कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व शरीराला मिळतात. लस्सीचे सेवन केल्याने उन्हाळ्यातही आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
1. उन्हापासून रक्षण
उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये जाणवणारी पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी लस्सीचं सेवन करणं आवश्यक असतं. लस्सी प्यायल्याने यामध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. एवढचं नाही तर शरीराची उष्णता कमी करण्यासाठीही मदत करते.
2. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी
लस्सीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया मजबुत होण्यासाठीही मदत होते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात बॅक्टेरिया असतात. जर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर लस्सी त्यावर गुणकारी ठरते.
3. अॅसिडीटीपासून सुटका होण्यासाठी
मसालेदार पदार्थ किंवा बाहेरी पदार्थ खाल्याने अॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये अॅसिडीटीची समस्येचा त्रास आणखी वाढतो. लस्सी यावर अत्यंत परिणामकारक ठरते. लस्सी थंड असते त्यामुळे अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते.
4. हाडांसाठी फायदेशीर
लस्सीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी ही फायदेशीर ठरते. हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज लस्सी पिणं फायदेशीर ठरतं.
5. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी
लस्सी प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. अनेक संशोधनांमधून ही गोष्ट सिद्ध करण्यात आली आहे की, लस्सीमध्ये असलेलं पोटॅशिअम आणि रिबोफ्लेविन यांसारखी तत्व ब्लड प्रेशर नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करतात.
6. वजन कमी करण्यासाठी
तुम्ही तुमच्या सतत वाढणाऱ्या वजनाने वैतागलेले असाल तर लस्सीचं सेवन करा. लस्सीमध्ये कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असतात आणि फॅट्सही नसतात. लस्सी प्यायल्याने शरीरातून फॅट्स निघून जातात.
7. इम्यूनिटी वाढविण्यासाठी
लस्सी प्यायल्याने यामध्ये आढळून येणारं लॅक्टिक अॅसिड आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.