सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे बाजारात आंबे दिसायला सुरूवात झाली आहे. आंबे खायला सगळ्यांनाच आवडतं. आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. घरोघरच्या महिला कैरी आणि आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करत असतात. आंबा त्याच्या गोडव्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा मानला जातो. आज आम्ही तुम्हाला आंबा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
आंब्यात मोठ्या प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.आंब्यात व्हिटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. तसंच जिंक मोठ्या प्रमाणात असंत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आंबा व्हिटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका रिसर्चनुसार शरीराचा उन्हापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
कोलेस्ट्रॉल कमी करतो
आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते.
स्मरणशक्ती वाढते
तुमचा विश्वास बसणार नाही पण आंब्याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. आंब्यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं. जे तुमच्या मेंदुच्या विकासासाठी गरजेच असतं. जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर नियमीत आंब्याचं सेवन केलं पाहिजे.
वजन कमी करणे
तुम्ही खवय्येगिरी करत असाल आणि वाढलेल्या वजनामुळे हैराण झालेले असाल तर तुम्ही आवर्जून आंबा खायला हवा. यातील पोषक तत्वांमुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरीक्त चरबी नष्ट होते. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. (आंबट आहे की गोड कसं ओळखाल? आंबे खरेदी करण्याआधी 'ही' ट्रीक माहीत करून घ्या)
रक्ताची कमतरता दूर होते.
आंब्यामध्ये आयर्न असतं. तुमच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील आयर्नची कमतरता भरून निघेल. यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढतं. अनिमियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
(चपाती खाऊनसुद्धा वजन होईल कमी, फक्त बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा)