उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? तुमचंही उत्तर नाही असेल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही घरीच हेल्दी आणि टेस्टी कुल्फी तयार करू शकता. कुल्फी मुलांना फार आवडते. बाजारामध्ये तयार करण्यात येणाऱ्या कुल्फीमध्ये अनेक केमिकल्स तसेच शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या पदार्थांचाही समावेश करण्यात येतो. त्यामुळ घरीच तयार केलेली कुल्फी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
बदाम दूध कुल्फी तयार करण्यासाठी साहित्य :
- बदाम
- क्रिम मिल्क
- मावा
- साखर
- केशर
बदाम दूध कुल्फी तयार करण्याची कृती :
- बदाम आणि गुलकंदची कुल्फी तयार करण्यासाठी सर्वात आधी बदाम भिजत ठेवा. त्यानंतर त्याची साल काढून पेस्ट तयार करा.
- पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ करून भिजत ठेवा. या गुलाबाच्या पाकळ्या मिश्रण घट्ट होइपर्यंत शिजवून घ्या.
- आता एक पॅन घेऊन त्यामध्ये दूध गरम करा. गरम केलेल्या दूधामध्ये केशर एकत्र करा. दूध मंद आचेवर उकळत ठेवा.
- त्यानंतर दूधामध्ये मावा, बदामाची पेस्ट, साखर आणि केशरचा अर्क माव्यामध्ये एकत्र होइपर्यंत एकत्र करा.
- आता हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये एकत्र करा. शिजलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, बदामाचे तुकडे यामध्ये एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा.
- कुल्फी व्यवस्थित सेट झाल्यानंतर बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्यांसोबत सर्व्ह करा थंड थंड कूल कूल बदाम दूध कुल्फी.
बदाम दूध कुल्फी खाण्याचे फायदे :
बदाम दूध कुल्फी तयार करताना घरात उपलब्ध असणाऱ्या पौष्टिक गोष्टींचा वापर करण्यात येतो. या पदार्थांमध्ये केमिकल्स अजिबात नसतात. उनहाळ्यामध्ये बाजारात मिळणारी कुल्फी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दूध, बदाम आणि केशर वापरून तयार केलेली कुल्फी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्ससोबतच आरोग्याला इतर पौष्टिक तत्व देण्यासही मदत करते. केशरचं सेवन केल्याने शरीराची इम्युनिटी सिस्टिम वाढते.