एक कुशल गृहिणी तिच असते, जी घरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेते, असं आपण नेहमीच ऐकतो. खरं तर घरातील प्रत्येक काम व्यवस्थित करण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. त्यामुळे कामं सहज आणि चटकन करण्यास मदत होते. परंतु सर्वच क्षेत्रांप्रमाणे किचनमध्येही आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर प्रत्येकालाच काही छोटया चिप्स माहीत असणं गरजेचं असतं. जर तुम्हीही किचनमधील या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तर किचन क्वीन बनण्यासोबतच तुम्हाला किचनमधील कामं झटपट करण्यासही मदत होइल...
आम्ही येथे काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला किचनमधील काम झटपट करण्यासाठी मदत करतील :
1. पनीर तयार केल्यानंतर जे दूधाचं पाणी शिल्लक राहतं, ते टाकून न देता. पिठ मळताना त्या पाण्याचा वापर करा.
2. भाज्या उकळलेलं पाणी टाकून न देता, त्यांचा वापर सूप किंवा डाळ तयार करण्यासाठी वापरा. त्यामुळे पौष्टिक तत्व मिळतात.
3. मोड आलेल्या डाळी जास्त वेलासाठी फ्रेश ठेवायच्या असतील तर त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा.
4. कचोरी सॉफ्ट आणि टेस्टी करण्यासाठी मैद्यामध्ये थोडं दही एकत्र करा.
5. दही लावताना जर दूधामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा टाकला तर दही 2 ते 3 दिवसांपर्यंत ताजं राहतं.
6. मूंगडाळीच्या भजी कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पिठ एकत्र करा.
7. तूप जास्त दिवसांपर्यंत फ्रेश ठेवायचं असेल तर त्यामध्ये एक गुळाचा तुकडा आणि एक छोटा सैंधव मीठाचा तुकडा एकत्र करा.
8. जर सकाळी लवकर उठून कोबीची भाजी तयार करायची असेल तर रात्री मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून तसचं ठेवा. यामुळे कोबीमध्ये असलेले किडे निघून जातील.
9. जर भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर त्यामध्ये पिठाचे दोन ते तीन मोठे गोळे करून टाका. थोड्या वेळाने ते काढून टाका. यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होइल.