शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 12:10 PM

Holi 2020 : आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते.

होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.  सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी तयार केली जाते. महिलांची पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जीभेवर विरघळतील अशा असाव्यात. कारण आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या ते सांगणार आहोत. 

सगळ्यांच्या घरी पुरणपोळी वेगवेगळी असते. वरचं आवरण अत्यंत पातळ असणारी, पुरेसं गोड आणि भरपूर पुरण भरलेली, उत्तम भाजलेली तेजस्वी पुरणपोळी करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कुठे तिचं आवरण जाड असतं, तर कुठे पोळीला खुसखुशीतपणाच नसतो. कुठे ती पुरेशी गोड नसते, तर कुठे पुरणाची पोळी असूनही पुरण अगदीच नावाला भरलेलं असतं, तर कुठे पुरणपोळी नीट भाजलेलीच नसते.

पुरणपोळीची सुरुवात पुरणापासून होते. त्यासाठी चणाडाळ अगदी उत्तम शिजवून चाळणीत घालून निथळून घेतलेली असते. निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला गूळ घालून पातेलं मंद विस्तवावर ठेवलं जातं. हळूहळू गूळ विरघळून डाळीशी एकजीव होऊ लागतो. प्रथम जरा पातळ होऊन पुरण हळूहळू घट्ट होऊ लागतं. 

पुरण फारच मऊ असताना गॅसवरून उतरवलं तर त्यात थोडा पाण्याचा अंश (डाळीतील) राहिल्यानं कणकेच्या पारीमध्ये ते भरलं की पारी ओलसर होऊन फाटू शकते. ती फाटू नये यासाठी मग जाड करावी लागते ज्यामुळे पुरणपोळीवरचं आवरण जाड होतं. याउलट पुरण फार कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवलं तर ते फळफळीत होतं आणि पोळी लाटताना नीट पसरलं जात नाही. पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरून उतरवून गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.पुरण वाटल्यावर त्यात अत्यंत बारीक वेलचीपूड आणि जायफळपूड घालून एकत्र करून पातेल्यावर कागद टाकून झाकून ठेवावं. पातळ टॉवेल झाकण म्हणून टाकला तरी चालतो. यामुळे वाफ धरून ती पुरणात पडत नाही आणि पुरण ओलसर होत नाही. या पद्धतीनं पुरणाला योग्य तेवढा मऊपणा येतो.पुरण तयार झाल्यावर कणीक भिजवायची असते. 

पोळी मऊसूत गुळगुळीत होण्यासाठी कणीक बारीक चाळणीनं चाळून घ्यावी. त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी ती तशीच ठेवावी. मग तेलाचा हात मधून मधून आणि पाण्याचा हात घेऊन ही कणीक खूप मळावी, तिंबावी. कणकेमध्ये एवढा मऊपणा आला पाहिजे की कणीक ताटावर एक फुटावर धरून हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटापर्यंत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

चाळून घेतलेली बारीक, मऊ कणीक असेल तर तार सुटण्यात अडचण येत नाही. मैद्यामध्ये कोंडा आणि बीज अजिबात नसल्यानं त्याला लवकर तार सुटते म्हणून काही ठिकाणी कणीक आणि मैदा किंवा रवा आणि मैदा पिठासाठी घेतले जातात. या कणकेची दोन रुपयाच्या नाण्याएवढी गोळी घेऊन तांदळाच्या पिठात बुडवून त्यावर त्याच्या तिप्पट ते चौपट मोठा पुरणाचा गोळा ठेवून हळूहळू पारी मोठी करून सर्व पुरण आत घालून पारी बंद करायची. तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हातानं हलके सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग खाली-वर तांदळाची पिठी घालून पोळी लाटण्यानं लाटून मोठी करायची. ( हे पण वाचा-फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)

पोळी करताना अशी काळजी घ्या

पुरणपोळी भाजताना तव्याखाली विस्तव मध्यम हवा. तव्यावर पोळी वरची बाजू वरच ठेवून टाकायची. थोड्या वेळानं उलटून टाकायची. त्या पृष्ठभागावरील तांदळाचं पीठ मऊ रूमालानं काढून टाकावं. अशाप्रकारे पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाली की कागदावर काढून घेऊन दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर पोळ्या डब्यात भराव्यात. तयार आहेत पुरणपोळ्या. ( हे पण वाचा-चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !).

टॅग्स :foodअन्नHoliहोळी