महिलांमध्ये अनीमिया म्हणजेच, शरीरात रक्ताची कमतरता आढळते. कारण आहाराकडे होणारं दुर्लक्षं आणि प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी यांमुळे महिलंच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनिमिया होतो आणि जर वेळीच लक्षं दिलं नाही तर ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते. अनिमिया होण्याचं मुख्य कारण म्हणजे, आहारामध्ये असलेली आयर्नची कमतरता होय.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणं शरीरामध्ये दिसून आली तर त्वरित ओळखून योग्य आहार घेऊन शरीरातील हिमोग्लोबिन वाढवता येऊ शकतं. अनीमियाची समस्या उद्भवल्यास आयर्नयुक्त आहार असणं अत्यंत आवश्यक असतं. भाजलेले चणे आणि गूळ हे अनीमियाच्या समस्यांवर गुणकारी ठरतं.
गूळ आणि चण्यांमध्ये अनीमिया दूर करण्याची क्षमता
गूळ आणि चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. चणे आणि गुळ फक्त रक्त वाढविण्यासाठीच नाहीतर शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्वचा, दात आणि बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांवरही उपायकारक ठरतात. खास गोष्ट म्हणजे, फक्त गूळ किंवा चणे खाणं जेवढं फायदेशीर ठरत नाही जेवढं एकत्र खाणं फायदेशीर ठरतं.
आयर्नचा मुख्य स्त्रोत असतो गुळ
गुळामध्ये सर्वाधिक आयर्न असतं आणि अनीमिया शरीरात होणाऱ्या आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे गूळ खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. गुळामध्ये फक्त आयर्नच नाहीतर सोडिअम, पोटॅशिअम आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात. दररोज जर डाएटमध्ये गुळाचा समावेश केला तर यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच गूळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.
कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत आहे चणे
चण्यांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स असतचं. तसेच फॉस्फरस, प्रोटीन आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असतं. म्हणजेच, चण्यांचं सेवन केल्यानं शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चणे शरीरातील रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतात. एवढचं नाहीतर किडनीसाठी अत्यंत फायदेशीर असतं.
गूळ आणि चणे एकत्र खाणं म्हणजे औषधचं...
चणे आणि गुळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. पण जेव्हा हे एकत्र खाण्यात येतात त्यावेळी औषधापेक्षा उत्तम काम करतात. खास गोष्ट म्हणजे, चणे आणि गूळ एकत्र खाल्याने शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळतात. त्यामुळे गूळ आणि चणे अनीमियाच नाहीतर इतर आजारांवरही फायदेशीर ठरतात.
मुठभर चणे आणि गुळ ठरतं फायदेशीर
संपूर्ण दिवसभरात जर तुम्ही मुठभर भाजलेले चणे आणि दोन मध्यम आकाराचे गुळाचे खडे खा. त्यामुळे शरीराला दररोज आवश्यक असणारं पोषण पूर्ण करण्यासाठी मदत होते. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे पदार्थ गुणकारी ठरतात.
जाणून घ्या गुळ आणि चण्यांचे फायदे :
1. चण्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं आणि जेव्हा हे गुळासोबत एकत्र खाण्यात येतात. त्यावेळी स्नायूंच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात. त्याचसोबत मेटाबॉलिक रेटही उत्तम असतो आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
2. चणे आणि गुळामध्ये झिंक मोठ्या प्रमाणावर असतं आणि हे त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन बी 6 मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
3. चणे आणि गुळामध्ये फायबर असतं आणि हे पचनक्रिया उत्तम होण्यासाठी मदत करतं. तसेच बद्धकोष्टाच्या समस्या दूर करतात.
4. चणे आणि गुळामध्ये फॉस्फोरस आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे दात आणि हाडांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपाय म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)