लहान मुलांना हेल्दी पदार्थ खाऊ घालणं म्हणजे फार कठिण काम. मुलं कधी काय खाण्यासाठी नकार देतील सांगता येत नाही. पण तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ हटके स्टाइलने तयार करून त्यांना देऊ शकता. खरं तर थंडीमध्ये मुलांसाठी काही गरमागरम पण त्यांना आवडणारा पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हॉट चॉकलेट ट्राय करू शकता. चॉकलेट म्हणजे मुलांना आवडणारा पदार्थ. जाणून घेऊया टेस्टी टेस्टी हॉट चॉकलेट तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 2 कप दूध
- 2 चमचे साखर
- डार्क चॉकलेट
- व्हेनिला एक्सट्रेक्ट अर्धा चमचा
- मार्शमेलो
हॉट चॉकलेट तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी पॅनमध्ये 2 कप दूध मध्यम आचेवर उकळून घ्या.
- दूध उकळल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यत उकळून घ्या.
- डार्क चॉकलेट बाउलमध्ये टाकून मायक्रोवेवमध्ये 30 मिनिटांसाठी ठेवा.
- 30 मिनिटांनी मायक्रोवेवमधून काढून व्यवस्थित एकत्र करा आणि पुन्हा मायक्रोवेवमध्ये ठेवा.
- चॉकलेट वितळल्यानंतर ते दूधामध्ये एकत्र करावे. त्यानंतर त्यामध्ये व्हेनिला एक्सट्रेक्ट टाकून काही मिनिटांसाठी उकळून घ्या.
- टेस्टी टेस्टी हॉट चॉकलेट तयार आहे.
- वरून मार्शमेलोने गार्निश करून सर्व्ह करा हॉट चॉकलेट.