अनेकदा जेवणात काय करायचं हा प्रश्न असतोच. विचार करून अगदी हैराण होतो पण काय करावं ते काही सुचत नाही. अशावेळी झटपट होणारा आणि चविष्ट असणारा एकादा पदार्थ करावासा वाटतो. पण म्हणजे कोणता याचा विचार करून डोकं फुटायची वेळ येते.
तुम्हीही अशाच विचाराने हैराण झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पाककृती सांगणार आहोत. खाण्यासाठी चविष्ट आणि आरोग्यासाठी हेल्दी असणारी ही रेसिपी अगदी झटपट तयार होते.
जाणून घेऊया दाण्याची आमटी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...
साहित्य :
- १ वाटी दाण्याचा कूट
- ३-४ हिरव्या मिरच्या
- २-३ आमसुले
- मीठ
- गूळ
- तूप १ मोठा चमचा
- अर्धा चमचा जिरे
कृती :
- मिरच्या बारीक वाटून घ्या.
- दाण्याच्या कुटात पाणी घालून बारीक वाटावे.
- कूट आणि मिरच्यांचे वाटण एकत्र करावे.
- त्यात एक ते दीड पेला पाणी घालावे.
- मीठ, गूळ व आमसुले घालून हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे.
- एका पळीत तूप घालून जिऱ्याची फोडणी करावी.
- ती उकळलेल्या आमटीत घालून पुन्हा एकदा उकळी काढावी.