रमजानचा पवित्र महिना नुकताच सुरु झालाय. या काळात मुस्लिम समुदायातील लोक 30 दिवस उपवास करतात. या दिवसात उपवास सोडताना खाण्याचीही चांगलीच चंगळ असते. मुस्लिम समुदायासोबतच खाण्याचे शौकीन लोक या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतात. यात शाही तुकडा या गोड पदार्थाचा नंबर सर्वात वरचा लागतो. चला जाणून घेऊया शाही तुकडा कसा तयार करायचा.
आवश्यक सामग्री
1 लिटर क्रीम असलेले दूध400 ग्रॅम मिल्क मेड6-7 स्लाईस ब्रेडकिशमीश, बदाम1 लहान चमचा वेलची पावडरफ्राय करण्यासाठी तूप
शाही तुकडा तयार करण्याची पध्दत
1) एका मोठ्या भांड्यात दूध आणि मिल्क मेड टाकून ते अर्ध होईपर्यंत उकडू द्या. त्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करा.2) त्यानंतर ब्रेड स्लाईस हवे त्या आकारात कापा आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. ते काढून पेपरवर ठेवा. 3) कडईतील शिल्लक राहिलेलं तूप तसंच ठेवून त्यात ड्रायफ्रूट फ्राय करा. 4) आता ब्रेडचे तुकडे प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर घट्ट झालेलं दूध टाका.