अनेकदा घरामध्ये रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर काही चपात्या शिल्लक राहतात. अशातच आपण त्या टाकून देतो किंवा तशीच राहून राहून ती खराब होतात. त्या फेकून देण्यापेक्षा त्यापासून टेस्टी रेसिपी तयार करण्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्ही रात्रीच्या शिळ्या चपात्यांपासून तयार करू शकता. खास गोष्ट म्हणजे यामुळे रात्रीची उरलेली चपाती तुम्ही चहा किंवा चटनीसोबत खाऊ शकता.
1. रोटी-पोटॅटो रोल
रात्री शिल्लक राहिलेली चपाती सकाळी रोल तयार करून खाऊ शकता. यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये तेल, जिरं, हिरवी मिरची आणि कांदा टाकून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये उकडलेला बटाटा टाका आणि मिरची पावडर, धना पावडर आणि हळदीची पावडर टाकून चवीपूरतं मीठ टाका. दुसऱ्या एका तव्यावर रात्रीच्या चपात्या भाजून घ्या. चपाती पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्या. तयार मिश्रण चपातीवर ठेवून रोल तयार करा. सॉस किंवा चटनीसोबत तुम्ही हा रोल खाऊ शकता.
2. चपाती चिप्स
चिप्स खाणं सर्वांनाच आवडतं. परंतु अनेकदा लोकं चिप्स खाणं टाळतात कारण त्यामध्ये तेलासोबत बटाटा असतो. अशातच एक वेगळा ऑप्शन म्हणून तुम्ही रात्री शिल्लक राहलेल्या चपातीचे चिप्स तयार करून खाऊ शकता. हा पदार्थ तयार करण्यासाठी रात्री शिल्लक असलेल्या चपात्या ऑलिव्ह ऑइलमध्ये डिप फ्राय करा आणि त्यातील एक्सट्रा तेल काढून घ्या. जेव्हा चपाती चिप्स क्रिस्पी होतील त्यावेळी त्यावर मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा.
3. रोटी कटलेट
रात्री शिल्लक राहिलेली चपाती तुम्ही रोटी कटलेट तयार करण्यासाठी वापरू शकता. यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये कांदा, उकडलेले बटाटे, थोडी हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. त्यामध्ये रवा मिक्स करा. त्यानंतर एका चपाचीवर ठेवून त्याला एका कटलेटचा आकार द्या. तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डिप फ्राय करू शकता.