सध्या न्यू ईयर फिवर सुरू आहे. घरातल्या घरात चवीष्ट आणि हटके पदार्थांची मेजवानी करण्याच्या विचारात आहात? चला तर मग जाणून घेऊया घरीच सोप्या पद्धतीने तयार करता येणाऱ्या पनीर रोलबाबत. हा पनीर रोल तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही तयार करू शकता. तसेच मुलांच्या डब्यात देण्यासाठी नवीन पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरतो. जेवताना स्टार्टर म्हणूनही तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. जाणून घेऊया हा पदार्थ तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 2 कप किसलेलं पनीर
- अर्धा कप उकडून कुस्करलेले बटाटे
- 2 टी-स्पून आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
- 4 टी-स्पून धने-जीरा पावडर
- 2 टी-स्पून लाल मिरची पावडर
- 1 टी-स्पून बडिशेप
- 2 टी-स्पून आमचूर पावडर
- 1 टी-स्पून गरम मसाला
- अर्धा कप कॉर्नफ्लेक्सचा चुरा
- तळण्यासाठी तेल
- 2 कप मैदा
- अर्धा कप पाणी
- हळद
- मीठ चवीनुसार
कृती :
- सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये पनीर, बटाटे, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, धने-जीरा पावडर, लाल मिरची पावडर, बडिशेप, मैदा, आमचूर पावडर, गरम मसाला, मीठ एकत्र करून त्याचे गोळे तयार करून घ्या.
- तयार गोळे कॉर्नफ्लेक्समध्ये व्यवस्थित घोळून घ्या.
- एका कढईमध्ये तल गरम करत ठेवा.
- तेल गरम झाल्यानंतर तयार गोळे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- गरमागरम हेल्दी आणि क्रंची पनीर रोल तयार आहेत.
- टॉमेटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा हेल्दी आणि क्रंची पनीर रोल.