हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ताजे मटार खायला मिळतात. नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. त्यामुळे आपण फ्रोजन मटार खाण्यपेक्षा ताजे मटार स्वयंपाक करताना वापरु शकतो. तर नुसतेच मटार पनीर आणि मटारची भाजी खाण्यापेक्षा मटार कचोरी तयार केलीत तर घरातील मंडळी खुष होईल. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची मटार कचोरी.
मटार कचोरी बनवण्यासाठी साहित्य सारण बनवण्यासाठी :-१) हिरवे मटार ३०० ग्राम२) अदरक १" टूकड़ा३) हिरवी मिरची १४) तेल १ चमचे५) मोहरी १चमचे६) चिमूटभर हिंग७) जिरे पूड १ मोठे चमचे८) धने पूड १ मोठे चमचे९) लाल तिखट १ छोटे चमचे१०) चवीनुसार मीठ११) साखर १ मोठे चमचे
(Image credit- Monisha gujral)
कव्हर बनवण्यासाठी :-१) मैदा २५० ग्राम२) तेल तळण्यासाठी + ३ मोठे चमचे३) साखर १ मोठे चमचे४) चवीनुसार मीठ५) पाणी आवश्यकतेनुसार.
(Image credit- meri saheli)
कृती-१) सर्व प्रथम एका वाडग्यात २५० ग्राम मैदा, ३ मोठे चमचे तेल , १ मोठे चमचे साखर, चवीनुसार मीठ, एकत्र करून घ्यावे२) पाण्याच्या साह्याने पीठ मळून घ्यावे. १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.३)आता गरम पाण्यात ३०० ग्राम हिरव्या मटार आणि मीठ २ मिनिट उकळवा. हिरव्या मटारचे सव॔ पाणी काढून टाकावे.४) मिक्सरमध्ये ३०० ग्राम उकलेले हिरव्या मटार, १" टूकड़ा अदरक , १ हिरवी मिरची वाटून घ्यावे .५) सारण बनवण्यासाठी कड़ाई मध्ये एक चमचे तेल गरम करावे.
६) त्यात १ चमचे मोहरी व चिमूटभर हिंग ची फोडणी घालावी.७) नंतर त्यात वाटाण्याची मिश्रण घ्यावे.८) १ मोठे चमचे जीरे पूड, १मोठे चमचे धने पूड, १ छोटे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ,१ मोठे चमचे साखर एकजीव करावे व मिश्रण चांगले परतून घ्यावे.९) मिश्रण प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावे.१०) मैद्याच्या पिठात छोटा गोळा घेऊन हाताच्या बोटांनी पसरवून घ्यावे.
(image credit-Cookpad.com)
११) मग त्यात हिरव्या मटारचे सारण भरून घ्यावे.१२) ऊंडा बनवून सव॔ बाजूंनी पॅक करावे.१३) सव॔ गोळा अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.१४) त्याची पोळी लाटून घ्यावी.१५) सव॔ कचोरी अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.१६) कड़ाई मध्ये तेल तापत ठेवावे.१७) दोन्ही बाजूंनी खुसखुशीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
( Image credit- Pinterest.com)
अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर ठेवावे.गरमागरम सव्ह॔ करावे.
(सौजन्य -betterbutter)