(image credit-twitter.com)
हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात दिसतात. पण सारख्या भाज्या खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्याच भाज्यांपासुन काहीतरी नविन केल्यास घरातील मंडळी आवडीने खातील. त्यापैकीच एक कोबीची भाजी ही पारंपारीक पध्दतीने घरात तयार केली गेली तर बऱ्याचवेळा लहान मुलचं नाही तर मोठी माणंस सुध्दा नाक मुरडतात. त्याच कोबीपासून तयार करण्यात आलेला झुणका तयार केला तर घरचे लोक बोट चाखत राहतील. तर जाणून घेऊया कोबीचा झुणका कसा तयार करतात.
साहित्य : १ छोट्या आकाराचा कोबी, ३ टेबलस्पून तेल, दोन हिरव्या मिरच्या, लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, साखर, हिंग, मोहरी आणि जिरं, ३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ.
कृती :
(Image credit-archnaskitchen.com)
कोबी पातळ उभा चिरून निथळत ठेवावा.
मिरच्यांचे मोठे तुकडे करून घ्यावे. तापलेल्या कढईत तेल घालावं.
तेल तापले की त्यात मोहारी, जिरं, हिंग, हळद आणि मिरची एकापाठोपाठ एक घालावे. त्यावर निथळलेला कोबी घालून परतावं.
मग लाल तिखट घालून परतून झाकण घालावं आणि एक वाफ येऊ द्यावी.
त्यात मीठ, साखर घालून भाजी शिजवून घ्यावी. शिजताना डाळीचं पीठ पेरावं आणि एकदा परतून मस्त वाफ येऊ द्यावी.
आच बंद करून पाच मिनिटं झाकण काढताच भाजी मुरू द्यावी.
कोबीचा झुणका तयार आहे. गरम झुणका, भाकरी, चटणी बरोबर खावा.