Signs of Chemically Ripened Banana: सध्या वेगवेगळे उत्सव सुरू आहेत. या दरम्यान लोक केळींचं भरपूर सेवन करतात. कारण केळी एक सुपरफूड आहे. केळी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी मिळते. मात्र, व्यापारी लोक केळी लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात. खासकरून केळी पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर केला जातो. हे पोटात गेल्यावर विषासारखं काम करतं. अशात नॅचलरी पिकलेली केळी किंवा केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची हे आज आपण जाणून घेणार आहोत.
1) नॅचरल पद्धतीने पिकलेल्या केळींवर काळे किंवा भुरक्या रंगाचे डाग असतात. तर कार्बाइडसारख्या केमिकलने पिकवलेल्या केळ्यांवर डाग नसतात. ही केळी दूरूनच चमकदार दिसतात. तसेच या केळांची टेस्टही कच्च्या केळ्यांसारखी लागते.
2) केमिकलने पिकवलेली केळी ठोस दिसतात. ही स्वच्छ आणि टवटवीत केळी दाबल्यावर पिकल्यासारखी वाटत असेल तर समजून घ्या की, ती केमिकलने पिकवलेली आहेत.
3) एक बकेट घ्या आणि त्यात पाणी टाका. आता यात केळ सोडा. जर ते नॅचरल पद्धतीने पिकलेलं असेल तर ते पाण्यात बुडायला लागेल, पण जर केमिकलने पिकवलेलं असेल तर पाण्यावर तरंगेल. अशाप्रकारे सहजपणे तुम्ही ओळख पटवू शकता.
4) जर केळ कुठून पिकलेलं आणि कुठून कच्चं दिसत असेल तर ते केमिकलने पिकवलेलं आहे असं समजा. जेव्हा केळ चारही बाजूने समान पिकलेलं दिसत असेल तर ते नॅचरल पद्धतीने पिकलेलं असेल.