Besan Paratha Recipe: सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. लोक नाश्त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ खातात. पण मुलांची शाळेची वेळ आणि ऑफिसला जाण्याची घाई यामुळे नाश्त्यात लवकर काय बनवायचं? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. नाश्ता हेल्दी पण हवा आणि टेस्टी सुद्धा. अशात आज आम्ही तुम्हाला सकाळी नाश्त्याला लवकर काय बनवता येईल याची एक रेसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला बेसनाच्या पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत. हे बेसनाचे पराठे लहानांना आणि मोठ्यांनाही आवडेल. चला जाणून घेऊ याची रेसिपी.
बेसन पराठे बनवण्यासाठीचं साहित्य
बेसन- 2 कप
पीठ- अर्धा कप
कांदे - बारीक कापलेले चार
एक तुकडा आले
जिरे एक चमचा
चवीनुसार तिखट
हळद पावडर एक चमचा
धणे पावडर दोन टेबलस्पून
कोथिंबिर
गरजेनुसार तेल
टेस्टनुसार मीठ
कसे बनवाल पराठे?
सगळ्यात आधी एक भांड घ्या त्यात बेसन आणि पिठासोबत सगळे मसाले मिक्स करून पीठ मळून घ्या.
यात थोडं तेल टाकाल आणि कढईत थोडं तेल टाकून थोडं भाजून घ्या.
त्यानंतर टेस्टनुसार यात थोडं मीठ टाका.
छोटे छोटे गोळे करून लाटून घ्या आणि तव्यावर पाचवा.
हे पराठे तुम्ही चटणी, दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता.