शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

आइस्क्रिम पकोडा, आइस्क्रिम टी ही कॉम्बिनेशन्स आॅड वाटताय का? पण एकदा खाऊन बघाच! हे फ्यूजन फूड खवय्यांना वेड लावतंय !

By admin | Published: May 30, 2017 6:04 PM

भारतात, महाराष्ट्रात सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्समध्ये मेन्युकार्डवर फ्यूजननं एण्ट्री केली आहे.तुम्हाला आवडेल का हे फ्यूजन फूड ट्राय करायला?

 

- सारिका पूरकर-गुजराथी

 

फ्यूजन...एव्हाना हा शब्द सर्वसामान्यांच्या तोंडी चांगलाच रूळलाय. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत याप्रमाणे संगीतातील फ्यूजन हा प्रकार सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे फ्यूजन हा शब्दही घराघरात पोहोचला आहे. फ्यूजन हा शब्द नसून ती संकल्पना आहे. मिलाफ, मेळ, संयोग अर्थात भिन्न संस्कृती, भिन्न विचार, भिन्न राहणीमान यातील विविध घटकांना एकत्र आणण्याची ही संकल्पना आहे. अलीकडे संगीतच नव्हे तर चित्रकला, शिल्पकला या व इतर कलाप्रकारांमध्ये फ्यूजन ही संकल्पना उचलून धरली जातेय.जग लहान होतोय म्हणतात ना, फ्यूजन संकल्पनेचाही हातभार आहे त्यात. माणसं, संस्कृती जोडण्याचं काम ही संकल्पना करतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

फ्यूजनची घौडदोड, तिचा संचार सर्वत्र असा जोरात सुरु असताना फूड इंडस्ट्री मागे कशी राहील. तिनेही फ्यूजन या संकल्पनेला जवळ केलय. भारतात, महाराष्ट्रात सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्समध्ये मेन्युकार्डवर फ्यूजननं एण्ट्री केली आहे. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील पाककृतींना एकत्र सांधण्याचा त्यांचा हा प्रयत्न लोकप्रियही झाला आहे. कारण अनेकांना पाश्चात्य पदार्थांच उदाहरणार्थ जपानचे मोमोज, इटालियन सिझलर्स, मेक्सिकन टॅको आणि अशा बऱ्याच पदार्थांचं आकर्षण तर असतच परंतु कुठेतरी भारतीय पारंपरिक चवीचीही सवय लागलेली असते. म्हणून थेट पाश्चात्य पदार्थांना ट्राय करण्याचं धाडस ते करीत नाहीत. मात्र फ्यूजन फूडमुळे नवनवीन चवी पण तरीही आपला वाटणारा स्वाद अनेकांच्या जिभेवर रेंगाळत आहेत.

 

तुम्हाला आवडेल का हे फ्यूजन फूड ट्राय करायला? पण त्यासाठी थोडी भटकंती तुम्हाला करावी लागेल. अर्थात नुसती फूडसाठी ती तुम्ही करु नका. पण जेव्हा कधी या शहरांमध्ये जाल तेव्हा नक्की ट्राय करा हे फ्यूजन फूड.

 

१) मुरक्कू सॅण्डविच

 

सोप्या भाषेत सांगायचे झालं तर चकली सॅण्डविच. चेन्नईतील सोकार्पेट या मुख्य बाजारपेठेत सॅण्डविचचा सुंदर प्रकार खवय्यांसाठी मिळतो. चेन्नईत स्थायिक झालेल्या मारवाडी बांधवांनी ही संकल्पना बाजारात आणली आहे. दिवाळीच्या दिवसात किंवा एरवी स्नॅक्स म्हणून चकली ( दक्षिण भारतात चकलीला मुरक्कू म्हणतात) घरोघरी तयार होते. त्याच चकलीचा वेगळा वापर सॅण्डविचला क्रंची टेस्ट देण्यासाठी केला जातो. विविध भाज्या, चटण्या आणि मधूनमधून मुरक्कू अशा या फ्यूजन सॅण्डविचला दर्दी खवय्यांनी भरभरुन दाद दिली आहे.

 

   

 

२) चॉकलेट पायनापल पिझ्झा

 

 चॉकलेट आणि पिझ्झा हे दोन असे पदार्थ आहेत की सगळ्यांच्या तोंडाला यामुळे पाणी सुटतं. मग या दोन घटकांचा उपयोग करुन काही इनोव्हेटिव्ह करता येते का? या विचारातून पुढे आलेली संकल्पना म्हणजे चॉकलेट पायनापॅल पिझ्झा. अहमदाबादमधील मणेक चौक या दर्दी खवय्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हा पिझ्झा तुम्हाला खायला मिळेल. भरपूर चीज, चॉकलेट, चेरीज आणि पायनॅपल टाकलेला हा पिझ्झा हटके टेस्ट देतो हे नक्की!

 

३) गार्लिक लेमन मिल्कशेक

 

धूम, साथिया, सिमला मिरची, संगम ही चित्रपटांची नावं नाहीयेत तर ती आहेत मुंबईतील माटूंगा (नवी मुंबई) येथील हेल्थ ज्यूस सेंटरमध्ये मिळणाऱ्या हेल्दी मिल्कशेकची. आरोग्य संवर्धक ज्यूसेस, मिल्कशेक्स येथे मिळतात. लसणाचा मिल्कशेक कधी ऐकला होता का तुम्ही? काही जणांना कच्चा आणि शिजवलेला अशा कोणत्याच फॉर्ममध्ये लसूण आवडत नाही. मात्र लसूण आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. तो लसूण मिल्कशेकच्या फॉर्ममध्ये मिळणार असेल तर त्याच्या नावानं नाकं मुरडणारेही गटागटा पितील हा मिल्कशेक.अगदी खात्रीनं.

 

                         

 

४) कॅडबरी मिल्कशेक

 

पुण्यातील कोथरुडमधील कॅड-बी/ कॅड-एम या कॅफेमधील चॉकलेट मिल्कशेक्स भारतभर लोकप्रिय ठरली आहेत. रिअल चॉकलेट, स्निकर्स यांचा भरपूर मारा असलेली मिल्कशेक पुण्यात गेल्यानंतर मस्ट ट्राय अशा चवीचीच आहेत.

 

५) आईस्क्रिम पकोडा

 

पकोडा, भजी हा तर समस्त भारतीय खवय्यांचा विक पॉईंट. नेमका तोच हेरुन मुंबईतील हाजी अली येथील कॅफे नुरानीत या पकोड्याला फ्यूजन लूक देण्यात आला आहे. गारेगार आइस्क्रिमच्या गोळ्याला कॉर्नफ्लेक्सचा चुरा, दूध, कॉर्नफ्लोअर वापरुन बॅटर तयार केलं जातं. त्यात आइस्क्रिमचा गोळा घोळवून तळले जाते. काय अनोखा प्रकार आहे राव हा...नक्की ट्राय करा..

 

 

        

 

६) आईस्क्रिम चाय

 

अगदी ऐकूनच भन्नाट वाटलं ना! चहा आणि आइस्क्रिम..काय ग्रेट कॉम्बिनेशन आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मसाला लायब्ररीची ही सिग्नेचर डिश म्हटली तरी चालेल. झोरावर कार्ला यांनी हे अनोखे कॉम्बिनेशन प्रत्यक्षात साकारलंय आणि ते खूप हिट देखील झालंय. आइस्क्रिमवर क्रिमी चहाचा लेयर आणि जोडीला दालचिनी फ्लेवर्सचे कुकीज. मग काय सुटलं ना पाणी तोंडाला!

 

७) श्रीखंड पॉप्सिकल

 

गुढीपाडवा, दसऱ्या घराघरात चवीनं खाल्ला जाणारा गोडाचा पदार्थ. घरी तयार केलेले किंवा बाजारातून आकर्षक कंन्टेनरमध्ये आणलेले... श्रीखंडाचं बस्स एवढंच रुपआपण पाहिलं आहे. मात्र बॉम्बे कॅँटीनमध्ये श्रीखंडाला अगदीच नव्या ढंगात सादर केलं जातं. पॉप्सिकलच्या रूपात भरपूर सुकामेवा, चिली क्रम्बलची डिश जोडीला देत श्रीखंड येथे आपल्या पुढ्यात पेश केलं जातं. ही यादी न संपणारी आहे. पान शॉट्स, पिझ्झा ढोकळा, हैदराबादी रिसेटो, फुलका टॅको असे असंख्य फ्यूजन फूडच्या संकल्पना भारतात साकारल्या जात आहेत. एकूण फ्यूजन फूडच्या चाहत्यांसाठी ही मेजवानीच म्हणायची!