(Image Credit : lifealth.co)
उन्हाळ्यात उसाचा रस पिणं फार फायदेशीर मानलं जातं. डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचा सल्ला देत असतात. गरमीमध्ये जर स्वत:ला हायड्रेट ठेवायचं असेल तर उसाचा रस तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण उसाचा रस पिताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे उसाचा रस पिताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
उसाच्या रसाचे फायदे
(Image Credit : TripAdvisor)
उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी जास्त जास्त द्रव्य पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. भरपूर पोषक तत्त्वे असलेला उसाचा रस शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतो. यात मॅग्नीज, पोटॅशिअम, झिंक, कॅल्शिअम, क्रोमियम, मॅग्नेशिअम आणि कोबाल्ट व फॉस्फोरस यांसारखे पोषक तत्त्वे असतात.
जरासं दुर्लक्ष करू शकतं नुकसान
(Image Credit : Global Food Book)
हे सर्व गुण असूनही जर तुम्ही उसाच्या रसाचं अधिक सेवन आणि योग्यप्रकारे सेवन करत नसाल तर तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. बाजारात मिळणारा ऊसाचा रस हा पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे की नाही हे सुनिश्चित करणे तुमचं काम आहे. याने चक्कर येणे आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टींची काळजी उसाचा रस पिताना घ्यावी.
जास्त घेऊ नका
(Image Credit : REMEDY IDEA)
उसाच्या रसामध्ये पोलिकोसनॉल असतं. यामुळे तुम्हाला चक्कर येणे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका होऊ शकतो. पोलिकोनसॉलने रक्तही पातळ होण्याचा धोका असतो. ज्यामुळे याचं सेवन प्रमाणातच केलं पाहिजे.
ऊस धुवून घ्या
(Image Credit : Beauty & Health tips)
बाजारात नेहमी सामान्यपणे ऊस धुवून न घेताच त्याचा रसा काढला जातो. त्यात बॅक्टेरिया आणि पेस्टीसाइड असतात. रस पिताना हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जातात. अशात संसर्गजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे उसाचा रस काढण्यापूर्वी तो धुवून घेण्यास सांगावं.
ठेवलेला रस पिऊ नये
(Image Credit : News Track English)
उसाचा रस फार लवकर खराब होता. त्यामुळे फार जास्त वेळ ठेवलेला ऊसाचा रस पिऊ नये. १५ मिनिटांच्या आत ऑक्सीडाइज होतो. अशात तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरतो.