Chapati Noodles : मॅगी हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. मॅगी बनवायला वेळही कमी लागतो आणि टेस्टीही लागते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स मिळतात. मात्र, मॅगीची जागी कुणीही घेऊ शकलेलं नाही. मागे सोशल मीडियावर मॅगीच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता मॅगीचं एक वेगळंच व्हर्जन समोर आलं आहे. चपातीपासून मॅगी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या डिशला चपाती मॅगी असं म्हटलं जात असलं तरी याला चपाती नूडल्स असं नाव देणं योग्य राहील.
व्हिडिओच्या सुरूवातीला डाएट एक्सपर्टं मॅक सिंह यांनी शिल्लक राहिलेल्या चपाती कात्रीने नूडल्ससारख्या कापल्या. नंतर एक पातेलं गॅसवर ठेवून, त्यात थोडं तेल टाकलं. नंतर पॅनमध्ये कापलेला कांदा, कापलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो प्यूरी टाकली. नंतर त्यात मीठ, हळद आणि थोडं लाल मिरची पावडर टाकतो. जेव्हा मिश्रण चांगलं तयार होतं तेव्हा त्यात त्यानी चपाती नूडल्स पॅनमध्ये टाकले. हे मसाल्यात चांगले मिक्स केले.
जर तुम्हालाही नूडल्स खायला आवडत असतील, पण त्याच त्याच पद्धतीचे खाऊन कंटाळले असाल तर ही वेगळी डिश ट्राय करू शकता. ही डिश हेल्दी तर असेलच सोबतच टेस्टीही असेल. या व्हिडिओवरून वादही पेटला आहे. कारण एक्सपर्टने या डिशला चपाती मॅगी असं नाव दिलं आहे. पण यात मॅगी अजिबात नाही. तर काही लोकांना ही वेगळी पद्धत आवडली. लहान मुलांना देखील ही डिश नक्कीच आवडेल.