फलाफल एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत लोकांना या पदार्थाने सर्वांनाच भूरळचं घातली आहे. हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की, कुठे मिळणार? कुठे शोधत फिरणार? पण ही हटके आणि क्लासी रेसिपी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. एवढचं नाही तर हा पदार्थ तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून तुम्ही अगदी सहज हा पदार्थ तयार करू शकता. तसेच खाण्यासाठी हा अत्यंत चविष्ट आणि हेल्दी असतो.
साहित्य :
- 2 कप उकडलेले काबुली चणे
- अर्दा कप सेलेरी
- एक बारिक कापलेला कांदा
- अर्धा कप बारिक कापलेली शिमला मिरची
- बारिक कापलेला पुदीना
- अर्धा कप शेपू
- मीठ चवीनुसार
- 2 चमचे जीरं
- गार्लिक पावडर किंवा बारिक कापलेला लसूण
- ऑरिगॉनो
- दालचिनी पावडर
- बेकिंग सोडा
- अर्धा कप तांदळाचे पीठ
कृती :
- मिक्सरमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून व्यवस्थित बारिक करा.
- तयार मिश्रण बाउलमध्ये काढून त्यांना कटलेटचा आकार द्या.
- हे कटलेट फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
- फ्राइंग पॅनमध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करा. तुम्ही डिप फ्रायही करू शकता.
- तयार फलाफल पुदिनाची चटणी किंवा मेयॉनिजसोबत सर्व्ह करा.