अनेकांना असं वाटतं की, भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे अनेकजण भात खाणंच बंद करतात. इच्छा असूनही अनेकजण भात खात नाही. मात्र आता भात आवडणाऱ्या पण वजन वाढण्याच्या भीती खाऊ न शकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण जपानमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, राइस बेस्ड जपानी किंवा आशियाई स्टाइल डाएट फॉलो केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
क्योटोमधील डोशिशा वुमेन्स कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्समधील संशोधकांच्या एका समूहाने १३६ देशातील लोकांच्या खाण्या-पिण्याच्या आणि राहण्याच्या सवयींचा अभ्यास केला. या रिसर्चच्या परिणामांमध्ये असा सल्ला देण्यात आला आहे की, ज्या देशांमध्ये भाताचं सेवन कमी प्रमाणात केलं जातं, त्यांच्या तुलनेत भाताचं सेवन अधिक केल्या जाणाऱ्या देशातील लोक सडपातळ असतात. त्यामुळे या रिसर्चच्या माध्यमातून कार्बोहायड्रेटचं सेवन कमी केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते या धारणेला नाकारण्यात आलं आहे.
या रिसर्चचे प्रमुख अभ्यासक प्राध्यापक टोमोको इमाई यांचं म्हणणं आहे की, 'ज्या देशातील लोकांच्या आहाराचा मुख्य भाग भात असतो, त्या देशातील लोकांमध्ये लठ्ठपणाचा दर फार कमी असतो. अभ्यासकांनी सल्ला दिला आहे की, ६५० मिलियन लोकांपैकी ६४३.५ मिलियन लोकांमध्ये प्रत्येक दिवशी ५० ग्रॅम भाताचं सेवन केल्याने लठ्ठपणा १ टक्क्याने कमी झाला'.
यूकेमध्ये राहणारे लोक एका दिवसात सरासरी १९ ग्रॅम भाताचं सेवन करतात. हे प्रमाण कॅनडा, स्पेन आणि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांपेक्षा फार जास्त आहे. अभ्यासकांनुसार, भात शरीराचं हेल्दी वजन कायम ठेवण्यासाठी एक आदर्श खाद्य पदार्थ आहे. कारण या लो-फॅट धान्यातून व्यक्तीला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं, त्यामुळे व्यक्तीचं पोट भरलेलं असल्याची जाणीव होते. इमाई यांचं म्हणणं आहे की, या धान्यात फायबर, पोषक तत्त्व आणि प्लांट कम्पोनेंट्स असल्याने याने व्यक्तीमध्ये तृप्तिची भावना वाढते आणि त्यामुळे अधिक भात खाण्यापासून रोखलं जातं.