जर तुम्ही विचार करत असाल की, फळं खाण्याऐवजी ज्यूस पिणं आरोग्यासाठी उत्तम ठरतं, तर कदाचित तुमचा हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. खरं तर ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही फळांऐवजी ज्यूसचा पर्याय निवडणं हे कदाचित चुकीचं ठरू शकतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाळ्यामध्ये आहारतज्ज्ञ फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच बाजारात मिळणारे पॅकेटबंद ज्यूस किंवा फळांपासून तयार केलेले ज्यूसही पिण्याऐवजी फळंच फायदेशीर ठरतात, असं त्यांच म्हणणं असतं. जाणून घेऊया आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं? फळं खाणं की फळांचे ज्यूस पिणं?
फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिण्याचा ट्रेन्ड
सध्या लोकांचा असा समज झाला असल्याचं दिसून येत आहे की, फळं खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. असं समज होण्यामागील मुख्य कारणं म्हणजे, तुम्ही हे ज्यूस तुम्हाला पाहिजे तेव्हा पिऊ शकता. तसेच तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्येही हे अगदी सहज कॅरी करू शकता. हे सर्व खरं असलं तरिदेखील फळांऐवजी ज्यूस पिणं हा उत्तम पर्याय ठरू शकत नाही. कारण फळांमधील अनेक पोषक तत्व ज्यूस तयार करताना नष्ट होतात. तसेच पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियांमध्ये वाढ होते, त्यामुळे ज्यूसमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होण्याची शक्यता असते.
काय ठरतं उत्तम फळं की फळांचे ज्यूस?
फळांमध्ये अस्तित्वात असणारं फायबर पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतं, त्यामुळे शरीर बराच काळापर्यंत हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. पण हेच जर फळांचा ज्यूस करायचं ठरवलं तर त्या प्रक्रियेमध्ये फळांमधील फायबर पूर्णपणे निघून जातात.
वेगाने वाढते ब्लड शुगर
शरीराला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स अब्जॉर्ब करण्यासाठी जेवढा वेळ लागतो. त्यापेक्षा कमी वेळात ज्यूस अब्जॉर्ब होतात. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते. अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. काही फळांच्या सालींमध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करणारे न्यूट्रिशंस असतात. पण पॅकेटबंद ज्यूस तयार करताना फळांच्या साली काढून त्यानंतर त्यांचा वापर करण्यात येतो. तसेच डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी ज्यूस पिणं हेल्दी ऑप्शन नाही.
इन्फेक्शनचा धोका अधिक
पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त धोका हा इन्फेक्शनचा असतो. ज्यूस पॅकेटबंद असो किंवा तुम्ही तयार केलेला, त्यामध्ये घातक बॅक्टेरियांचा समावेश कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. पण त्याऐवजी फळांमध्ये तुम्ही स्वतः हाताने निवडून त्यानंतर स्वच्छ धुवूनच खाता.
पचनासंबंधिच्या तक्रारी...
फळांच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक नसतं. परंतु साखरेचं प्रमाण यामध्ये अधिक असतं. त्यामुळे फळांचा रस प्यायल्यानंतर अनेकदा लूज मोशन्स किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही ज्यूस जास्त पित असाल, तर शरीरामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे फळं खाताना अजिबात समस्या होत नाहीत.
पॅकेटबंद ज्यूस वाढवतात वजन
पॅकेटबंद ज्यूसमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. यामध्ये एनर्जी लेव्हल मोठ्या प्रमाणावर असते. याचा वापर करून भूक वाढते. तसेच वजन वाढण्याची शक्यताही वाढते. अशातच वजन कमी करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. फळं खाल्याने पोट दिर्घकाळ भरल्याप्रमाणे वाटतं. ज्यामुळे तुम्ही फूड क्रेविंगपासून बचाव करू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.