रोजच्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असतं. तसंच आहार चुकीचा घेतल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवते. पण जर तुम्हाला फीट राहायचं असेल तर काही सहज उपलब्ध होत असलेल्या घटकांचा समावेश आहारात केल्यास वजन सुध्दा कमी होईल तसंच त्यासाठी कोणतीही मेहनत सुध्दा करावी लागणार नाही.
हेल्दी डाएट आणि वेटलॉस टीप्ससाठी प्रसिध्द असलेल्या डाएट एक्सपर्ट रुजुता दिवेकर यांनी वजन कमी करण्यासाठी दिलेल्या काही टीप्स आज तुम्हाला सांगणार आहोत. शिंगाडा खाण्याचे काही फायदे रुजुता दिवेकर यांनी सांगितले आहेत. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या शिंगाड्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. तसंच शिंगाड्यामध्ये पोषक तत्व आणि व्हिटामीनचं प्रमाण खूप असतं. चला तर मग जाणून घेऊया शिंगाड्याचे काय आहेत फायदे.
डाएट एक्सपर्टस शिंगाड्याला वॉटर चेस्टनट असं म्हणतात. शिंगाड्यामध्ये अॅन्टी-ऑक्सीडेंटस आणि व्हिटामीन्स तसंच मीनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. फर्टिलिटी वाढवण्यासाठी तसंच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राहण्यासाठी शिंगाडा फायदेशीर ठरतो. तसंच ज्या व्यक्तींना रक्तदाबाशी निगडीत समस्या उद्भवतात त्यांचासाठी शिंगाडा लाभदायक ठरतो. शिंगाडा खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. यामुळे उपवासात शिंगाड, शिंगाड्याचे पीठ खाल्ले जाते.
सर्वसाधारणपणे लोक उपवासाच्या दिवशी शिंगाडा खातात. पण आरोग्य नीट ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात शिंगाड्याचा समावेश करणं गरजेचं आहे. शिंगाड्याला तुम्ही साल काढून खाऊ शकता. तसंच कच्चं सुध्दा खाऊ शकता. किंवा शिंगाड्याचं पीठ दळुन तुम्ही त्याची भाकरी तयार करू शकता. शिंगाड्याचे सेवन केल्यानंतर आरोग्याला होणारे फायदे बरेच आहेत.
शिंगाड्याचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच डाएट फुडमध्ये शिंगाड्यांचा समावेश होतो. शिंगाड्याचे सेवन केल्याने शरीराला अनावश्यक असणारे टॉक्सिन शरीराबाहेर टाकले जातात. अँटिऑक्सिडंटप्रमाणेच ते अँटिबॅक्टिरिअल, अँटिवायरल आणि म्हणून काम करतं. थकवा येणे, तोंडाला चव नसणे यासारख्या विकारांसाठी हा उत्तम उपाय आहे.
युरीन इन्फेक्शन झाल्यास शिंगाडा हे अतिशय चांगलं औषध आहे.
पोटाच्या सर्व आजारांवर शिंगाड्याचा रस अतिशय गुणकारी आहे. अपचन झाल्यास याचा रस प्यायल्याने आराम पडतो.
शरीरात उष्णता वाढल्यास शिंगाडय़ाचा रस प्यावा, उष्णता बाहेर पडण्यास मदत होते.
शरीरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता असल्याने हे फळ नियमित सेवन करावं.
अंगावर सूज आल्यास त्यावर शिंगाड्याच्या सालीची पावडर करून ती पाण्यातून लावल्याने लवकर आराम मिळतो..
शिंगाड्यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम, झिंक, ब आणि ई जीवनसत्त्व असतं. ज्यामुळे केस चांगले राहतात.