चणे हे सगळेजण खात असतात. कधी भाजलेले तर कधी भाजीत तर कधी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चण्यांचा वापर केला जातो. पण जर तुम्ही डाएट करायचा विचार करत असाल तर तुमच्या आहारात काळेचणे असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहितही नसेल पण जर तुम्ही चण्यांचं सेवन केलं तर शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटामीन्स आपल्याला मिळतात. तसंच काळ्या चण्यांचा आहारात समावेश केला तर एक-दोन नाही अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया चणे खाण्याचे फायदे काय आहेत.
पोषक घटक
काळ्या चण्यांमध्ये क्लोरोफिल, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी तसचं फॉस्फरस सुद्दा असतं. पोटॅशियम, मॅग्नीशियमची शरीराला भासणारी गरज काळ्या चण्यांचं सेवन केल्याने पूर्ण होते. या चण्यांचा ग्लाईसेमिक इन्डेस्क सुद्दा कमी असतो. त्यामुळे परफेक्ट बॉडी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चण्यांचा खाण्यात समावेश करावा. जर काळेचणे तुम्ही गुळासोबत खाल्ले तर खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे शरीराला उर्जा मिळते.
काळ्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. जे तुमची पचनक्रीया सुधारण्यासाठी महत्वाचे असतात. तसचं चणे जर तुम्ही रात्री भिजवून सकाळी खाल्ले तर अधिक फायदेशीर ठरेल. या चण्यांचं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
हृदयाच्या आजारांसाठी फायदेशीर
काळ्या चण्यांमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. काळ्या चण्यामध्ये जे पोषक घटक असतात. त्यांच्या आधारे तुम्ही हार्ट अर्टक आणि हार्ट स्ट्रोकच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकता.
डायबिटीसपासून बचाव
डायबिटीजच्या रुग्णांनी काळ्या चण्यांचे सेवन केल्यास खूप फायदेशीर ठरतं असते. यात असणारे कार्बोहायड्रेटस शरीरात संतुलन ठेवतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थीत राहते. काळ्या चण्यांच्या सेवनाने डायबिटीस टाईप२ चा धोका टळू शकतो. तसंच शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते.
गरोदर महिलांसाठी उपयुक्त
गरोदर महिलांसाठी तसंच स्तनपान करत असलेल्या महिलांसाठी काळे चणे फायदेशीर ठरतात. त्यात आर्यनचे प्रमाण जास्त असल्यामुळे एनीमिया रोखण्यासाठी फायदेशीर ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर
काळेचणे शरीरसाठी फायदेशीर असतातच पण ते त्वचेसाठी सुध्दा उपयुक्त असतात. हे चणे भिजवलेल्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहरा चमकदार होतो. तसंच कोरडेपणा निघण्यास मदत होते.