काजू भलेही जरा महाग असले तरी काजू खाणे सगळ्यांनाच आवडतं. याचा वापर स्वीट डिशपासून वेगवेगळ्या भाज्या आणि स्नॅक्स म्हणूनही केला जातो. पण तुम्हाला काजुचे फायदे माहीत आहेत? काजूचे आरोग्याला आणि त्वचेला होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? नसेल तर आज जाणून घेऊ...
खराब कोलेस्ट्रॉल करतं कमी
काजुमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. त्यासोबतच यात व्हिटॅमिन सी आणि बी सुद्धा असतात. तसेच यात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेडेट फॅटी अॅसिडही असतं. जे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल कमी करण्यास मदत करतं.
वजन कमी करण्यासही फायदेशीर
लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, काजू खाल्ल्याने वजन वाढतं. हे अजिबात खरं नसून उलट काजूने वजन कमी करण्यास मदत मिळते. यातील मॅग्नेशिअम फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण रेग्युलेट करण्यास मदत मिळते. ज्याने थेट वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच काजुने हाडेही मजबूत होतात.
फॅट होत नाही जमा
काजुमध्ये डायटरी फॅट्स असतात जे शरीरात असलेल्या फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जसे की, ए, डी, ई आणि के ला अब्जॉर्ब करण्यास मदत मिळते.
डायबिटीजचे फायदे
काजुमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं आणि यात खराब कोलेस्ट्रॉलही नसतात. ज्यामुळे काजू डायबिटीजच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. पण त्यांनी काजू कमी प्रमाणात सेवन करावे.
लाल रक्तपेशी वाढण्यास मदत
काजुमध्ये भरपूर प्रमाणात कॉपर असतं, जे आयर्नचं मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतं. याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते.
पित्ताचा खडा काढण्यास मदत
एका रिसर्चनुसार, काजू पित्ताची खडा काढण्यासाठी मदत करतो. २००४ मध्ये प्रकाशित या रिसर्चमधून समोर आलं होतं की, काजुचं सेवन केल्याने पित्ताचा खडा होण्याचा धोका ३० टक्क्यांनी घटतो.
त्वचेसाठीही फायदेशीर काजू
(Image Credit : BeBeautiful)
काजुचा वापर वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्येही केला जातो. जर तुमची त्वचा उन्हात भाजली गेली असेल तर ही समस्या काजुने दूर केली जाऊ शकते. त्यासोबतच पायांना भडलेल्या भेगाही भरल्या जातात आणि पाय मुलायम होतात.