सिनेमा थिएटरमध्ये मुव्ही पाहताना इंटरव्हलमध्ये अनेकांना पॉपकॉर्न खाण्याची सवय असते. मूव्ही आणि पॉपकॉर्न हे समीकरणच तयार झालं आहे. पॉपकॉर्न नसेल तर मूव्ही पाहण्यात काहीतरी कमी होतं, असं अनेकदा जाणवतं. सध्या तर बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या पॉपकॉर्नच्या 2 मिनिटांत बनणाऱ्या पाकिटांमुळे घरच्या घरीही सहज पॉपकॉर्न तयार करता येतात. टीव्हीवर एखादी रंगलेली मॅच असेल किंवा घरच्या घरी एखादा मूव्ही बघण्याचा बेत असेल तर सहज घरी पॉपकॉर्न तयार करून पॉपकॉर्न आणि मूव्हीचं समीकरण जुळवून आणता येतं. हे सर्व जरी खरं असलं तरीदेखील पॉपकॉर्न शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. जाणून घेऊयात पॉपकॉर्नपासून शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील पेंसिलवेनियामध्ये झालेल्या नॅशनल मीटिंग ऑफ द अमेरिकन डॉक्टर्स सोसायटीच्या बैठकीत एका संशोधनाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये पॉपकॉर्न खाल्याने शरीराला होणाऱ्या फायद्याबाबत सांगण्यात आले होते. यूनिवर्सिटी आफ स्कार्नटनच्या संशोधकांनी शोधातून असा दावा केला आहे की, पॉपकॉर्नमध्ये असलेलं फायबर आणि पालीफिनाइल वृद्ध व्यक्तींमधील कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित रोगांसंबधिच्या सर्व समस्या कमी करण्याच काम करतात.
संशोधनातून असं सांगण्यात आलं आहे की, पॉपकॉर्नमध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडिकल्स बाहेर टाकण्याचं काम करतात. फ्री रेडिकल्स म्हणजे शरीरातील अशी तत्व जी शरीरातील पेशी आणि स्नायूंना नष्ट करतात.
जर तुम्हाला बद्धकोष्टाची समस्या असेल तर पॉपकॉर्न खाणं फायदेशीर ठरतं. त्याचं झालं असं की, पॉपकॉर्नमध्ये असलेलं फायबर आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
पॉपकॉर्न वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर असतं. पॉपकॉर्नमध्ये व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थांसोबतच डाएटरी फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. त्याचबरोबर यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे बजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
कॅन्सरवर परिणामकारक
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पॉपकॉर्नमध्ये असलेले फायबर आणि पालीफिनाइल कॅन्सरसारख्या आजारंचा धोका कमी करतं.