साबुदाणा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. मग ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर. पण बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्यापासून तयार होणाऱ्या हटके रेसिपीबाबात सांगणार आहोत. तुम्हीही दररोजच्या साबुदाण्याच्या पदार्थांचा कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचा पुलाव तयार करण्याच्या रेसिपीबाबत सांगणार आहोत.
साबुदाण्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. साबुदाणा अॅनिमिया, पोटाच्या समस्या, ब्लड प्रेशर आणि हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतो. तसेच साबुदाण्यामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जाणून घेऊया साबुदाणा पुलाव तयार करण्याची सोपी रेसिपी...
साबुदाण्याचा पुलाव तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- साबुदाणे
- तूप
- काजू
- कोथिंबीर
- बटाटे
- हिरवी मिरची
- शेंगदाणे
- लिंबाचा रस
- काळी मिरी पावडर
- मोहरी
- मीठ चवीनुसार
साबुदाणा पुलाव तयार करण्याची कृती :
- एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवा. बटाटे उकडल्यानंतर त्यांची साल काढून छोटे तुकडे करून घ्या.
- हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पानं बारिक चिरून घ्या. साबुदाणे पाण्याने धुवून जवळपास एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा.
- कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल एकत्र करून काडू फ्राय करा. आता पुन्हा कढईमध्ये तूप गरम करत ठेवा. त्यामध्ये मोहरी आणि बारिक मिरची टाका.
- आता कढईमध्ये उकडलेला बटाटा फ्राय करून घ्या. आता त्यामध्ये साबुदाणे, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर आणि मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- साबुदाणे झाकून 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्या. आता पुलावामध्ये काजू एकत्र करा. गरम गरम सर्व्ह करा साबुदाण्याचा पुलाव.