हिवाळा सुरू होऊन २ महीने झाले आहेत. वातावरणात थंडी पसरली आहे. अशा वातावरणात थंडीमुळे होत असलेल्या आजारांपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण शरीरात गरमीचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. कारण कोणताही आजाराचा सामना करण्याआधी घरगुची पदार्थांचा वापर करून आपण त्या आजारांशी लढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया घरगुती वापरात असलेल्या आणि सहज कमी किमतीत उपलब्ध होत असलेल्या डिंकाचे काय आहेत फायदे.
भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे घराघरात मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू तयार करण्याची तयारी सुरू आहे. कारण डिंक हे आरोग्यासाठी लाभदायक ठरत असत. म्हणून अनेक स्त्रिया लाडू कुरकूरीत येण्यासाठी आणि त्यातून पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी डिंकाचा वापर करतात. पण लाडूंमध्ये डिंक घातलेले सगळ्यांनाच आवडत असं नाही. काही लोक डिंक आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ टाळतात. पण जर तुम्हाला डिंकाचे आरोग्याच्या दृष्टीने होत असलेले फायदे माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला त्या बद्द्ल माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया डिंकाचं सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.
पचनक्रीया सुधारते
डिंकामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे त्वचेची काळजी घेण्यासाठी ओळखलं जातं. डिंक रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याची पौष्टीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये बदामाची पावडर आणि दूधही तुम्ही मिक्स करू शकता. दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून आराम
हिवाळ्यात डिंकांच सेवन केल्याने शरीरासाठी लाभदायक ठरत. त्यामुळे जर तुमचे गुडघे, पायय हात दुखत असतील तर आराम मिळतो, सांघेदुखीची समस्या उद्भवणं कमी होत. तसंच कमरेच्या दुखण्यावर सुध्दा आराम मिळतो. हाडांना बळकटी देण्यासाठी डिंक फायदेशीर ठरतं.
महिलांसाठी फायदेशीर
डिंक शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कायमचा जातो. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल अश्यांनी दररोज डिंक लाडू खावे. तसंच मणक्यांचा त्रास असल्यास डिंकाचे सेवन केल्याल आराम मिळतो. तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतं
गरोदर मातेसाठी उपयुक्त
बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध वाढवण्यासाठी डिंक फायदेशीर ठरतं. म्हणून मातेला डिंकाचे लाडू खाण्यासाठी दिले जातात. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. तसंच महिलांची हाडं त्या वेळी काही प्रमाणात कमकूवत झालेली असतात. म्हणून त्यावेळी हाडांना पोषण मिळण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
हृदयासाठी फायदेशीर
डिंकाचे सेवन केल्याने शरीरात रक्तपूरवठा व्यवस्थित राहतो. तसंच हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका कमी होतो. कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं.