आज कोजागिरी पोर्णिमा... अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा असे म्हटले जाते. संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की, या दिवशी खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. यामागील कारण असं सांगितलं जातं की, या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी पूर्ण असतो. त्यामुळे रात्री 12 वाजल्यानंतर खीर किंवा मसाला दूध घेणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु या फक्त बोलायच्या गोष्टी झाल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खुल्या आभाळाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात...
कोजागिरीनिमित्त खीर तयार करण्याची पाककृती :
1. एका मोठ्या पातेल्यामध्ये दूध टाका आणि ते आटवून घ्या.
2. दूध व्यवस्थित आटल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाका.
3. तांदूळ शिजेपर्यंत हे मिश्रण ढवळत रहा.
4. तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाका.
5. काही वेळ शिजवल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून घ्या.
6. गरमगरम खीर खाण्यासाठी तयार आहे.
कोजागिरी पोर्णिमेला खीर खाण्याचे फायदे :
1. असं मानलं जातं की, कोजागिरी पोर्णिमेला तयार करण्यात आलेली खीर अस्थमा असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असते.
2. अस्थमाच्या रूग्णांसोबतच कोजागिरी पोर्णिमेची खीर स्किनच्या प्रॉब्लेम्सनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर ठरतं. असं म्हटलं जातं की, कोणी स्किन प्रॉब्लेम्सनी त्रस्त असाल तर कोजागिरीला खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतं.
3. त्याचप्रमाणे अशीही मान्यता आहे की, ही खीर खाल्याने डोळ्यांशी निगडीत असलेले सर्व आजार दूर होण्यास फायदेशीर ठरतात. यामागे अशी मान्यता आहे की, कोजागिरी पोर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जास्त असतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमजोर असणाऱ्या लोकांनी या चंद्राकडे एकटक पाहणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
4. डोळे, दमा आणि त्वचेचे रोगांवर गुणकारी ठरणारी कोजागिरी पोर्णिमेला खुल्या आकाशाखाली तयार केलेली खीर हृदय विकारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांसोबतच, फुफ्फुसांच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रूग्णांठीही फायदेशीर ठरते.