आपल्या जेवणाची चव वाढविण्याचं काम मीठ करतं. मीठाशिवाय जेवण अगदी बेचव लागतं. योग्य प्रमाणात मीठ असेल तर मात्र पदार्थाच्या चवीची बातच न्यारी. पण जास्त मीठ आरोग्यासाठी घातक आहे. चविष्ट जेवणासोबतच मीठाचे अनेक फायदे देखील आहेत. कपड्याचा रंग जात असेल तर पाण्यामध्ये मीठ टाका आणि त्यामध्ये कपडे भिजवून ठेवा. 1 तासानंतर कपडे बाहेर काढा. त्यानंतर कपड्याचा रंग जाणार नाही. मात्र मल्टिकलर कपड्यांसाठी मीठाचा वापर करू नका.
घरातील दरवाजे आणि खिडक्यांवर गंज लागला असल्यास एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाका. स्पंजच्या मदतीने खिडकी आणि दरवाजाची स्वच्छता करा. बटाटे कापून ठेवल्यास ते काही वेळात काळे पडतात. कापलेल्या बटाट्यावर थोडंस मीठ लावा म्हणजे तो काळा होणार नाही आणि फ्रेश राहील. फर्निचरवर डाग पडले असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी मीठाचा वापर केला जातो.
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. मीठाचा वापर करून भांडी घासल्यास ती चमकतात. अनेकदा डॉक्टर्सही मीठ कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठामध्ये सोडियम असतं. अनेकदा लोक डोकेदुखीवर किंवा चक्कर येण्यावर उपाय म्हणून जास्त मिठाचे सेवन करतात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं आम्ही नाही तर संशोधकांनी सांगितलं आहे.
अनेकदा कांदा काकडी, मुळा, खाताना आपण त्यावर मीठ घालून खातो. अशा पद्धतीचं खाणं चवीला जरी चांगलं लागत असलं तरी वरून मीठ घेण्याची सवय महागात पडू शकते. आणि त्यांमुळे वेगवेगळे आजार होतात. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने हृदयाचे, किडनीचे किंवा नसांचे आजार होतात. जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. जेवणातील मीठात असलेलं आर्यन शरीरात सहज पचवता येतं. पण कच्च्या मीठाचं सेवन शरीरावर प्रेशर पाडतं. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. मीठाचं अधिक सेवन केल्याने तहान कमी आणि भूक जास्त लागते. त्यामुळे जेवताना वरून खाल्ल्यास आजारांना निमंत्रण मिळते. ही वेळ टाळण्यासाठी जेवताना वरून मीठ घेणे टाळा.
'या' बातम्याही नक्की वाचा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्की करा
'बुलेट कॉफी' प्यायलीय का?... आरोग्यदायी फायदे वाचून नक्की ट्राय कराल!
आनंदी राहण्याचा फंडा काय आहे? हा तुम्हाला समजला तर जीवनात कधीच येणार नाही निराशा!
थंडीत संत्री खाणं ठरतं आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कसं