आपल्या चविष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय शेफ योगिता बिले आज आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. योगिता आज प्रेक्षकांना खास 'पुरणाचे माझा मोदक' करून दाखवणार आहेत. मांगल्याचे प्रतिक असलेला सर्वांचा गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे. मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळेच गणेशोत्सवही अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा घरोघरी हमखास केला जातो.
गजाननाची मनोभावे पूजा केली जात आहे. हल्ली विविध पद्धतीचे मोदक केले जातात. उकडीच्या मोदकांसोबतच चॉकलेट मोदक, रवा मोदक, ड्रायफ्रूट्स मोदक, तळलेले मोदक करण्याकडे गृहिणींचा अधिक कल असतो. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.
२१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. योगिता बिले आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध आहेत. देशाच्या विविध भागातील अनेक पारंपरिक पदार्थ आजच्या नवीन पिढीला माहीत नाहीत. ते लोप पावत आहेत. हे पदार्थ सर्वांना माहीत व्हावेत यासाठी योगिता यांनी स्वत:च एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे.
योगिता बिले यांचं योगिताज किचन (Yogita's Kitchen) या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. २०१७ मध्ये त्यांनी याला सुरुवात केली असून स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे २७० हून अधिक व्हिडीओ प्रसारीत झालेले आहेत. योगिता बिले यांचं सासर आणि माहेर दोन्ही तळकोकणातील कुडाळ येथील असल्याने कोकणच्या संस्कृतीमध्ये पाककृती तयार करण्याचे धडे लहानपणापासून त्यांनी घेतले आहेत. त्यांचे वडील हॉटेल व्यावसायिक तर विवाहानंतर पतीची अनेक ठिकाणी बदली झाल्याने विविध प्रांतातील पाककृती शिकण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या योगिता बिले प्रेक्षकांना आज खास 'पुरणाचे माझा मोदक' करून दाखवणार आहेत.
योगिता बिले यांच्या 'पुरणाचे माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://yogitaskitchen.com/ आणि Lokmat.com/MaazaModakया वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.