यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. कालपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.
माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यामध्ये आज आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग आहे. भारती म्हात्रे यांना स्वादिष्ट पदार्थ करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी आपली हिच आवड लक्षात घेऊन ती व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. एक गृहिणी ते सुपर शेफ असा जबरदस्त प्रवास त्यांनी केला आहे. भारती म्हात्रे यांचं 'सिंपली स्वादिष्ट' (Simply Swadisht) नावाचं एक युट्यूबवर चॅनल आहे. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यावर त्या नेहमीच नवनवीन पदार्थांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.
माझा पनीर मोदक
साहित्य:
२५० ग्रॅम पनीर
१ कप(२५० ग्रॅम) दूध पावडर
१/२ कप माझा ड्रिंक
१/३ कप पिठीसाखर
गुलकंद(सारणासाठी)
पिस्ता
कृती:
पनीर मिक्सरला बारीक करून घ्या.
हे पनीर मंद आचेवर काही मिनीटांसाठी शिजवून घ्या.
त्यात १/२ कप माझा ड्रिंक घ्या व पनीरने संपूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवत राहा.
गॅस बंद करा व मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
वरील मिश्रणात दूध पावडर, पिठीसाखर आणि माझा ड्रिंक मिक्स करून घ्या.
हे मिश्रण फ्रीजमध्ये १० ते १५ मि. साठी ठेऊन द्या.
मोदकाचा साचा घ्या व त्यात पनीरचे मिश्रण घाला.
गुलकंद त्याच्या मध्यभागी घालून मोदक बंद करून घ्या.
साच्यातून मोदक बाहेर काढा.
तुमचे पनीर मोदक आहेत तयार!
पिस्ता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट वापरून मोदकांची सजावट करा.
भारती म्हात्रे यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/SimplySwadisht_BharatiMhatre/आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.