'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.
२१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. प्रसिद्ध शेफनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकप्रिय फूड ब्लॉगर सोनाली राऊत स्वादिष्ट 'बदाम माझा मोदक' दाखवले आहेत.
सोनाली राऊत यांचा 'नमकशमक डॉट कॉम' नावाचा (Namakshamak.com) एक फूड ब्लॉग आहे. रुचकर मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर होस्ट म्हणूनही काम केलं आहे. यासोबत त्यांचे स्वत:चे 'कूक विथ सोनाली' (Cook with Sonali Raut) असं हिंदी यूट्यूब चॅनल आणि बहिणीसोबत नमकशमक (Namakshamak) नावाचं इंग्रजी यूट्यूब चॅनल आहे. जिथे त्या नेहमी नवनवीन रेसिपी घेऊन येत असतात. सोनाली यांनी याआधीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. विशेषत; लहान मुलांना आवडणाऱ्या चॉकलेटचे 'चॉकलेट माझा मोदक' करून दाखवले होते. सोनाली यांनी प्रेक्षकांना खास चविष्ट 'बदाम माझा मोदक' दाखवले आहेत. मग पाहा बदाम माझा मोदकांचा व्हिडीओ.
बदाम माझा मोदक
साहित्य:
१/४ कप रवा१/२ कप दूध पावडर३/४ कप बदाम पावडर२ कप माझा मॅंगो ड्रिंक१ टेबलस्पून तूप
कृती:
गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवा.कढईत तूप गरम करून घ्या व त्यात काही मिनिटांसाठी मंद आचेवर रवा भाजून घ्या.आता बदाम पावडर घालून २ मि. साठी परतून घ्या.आता आपण दूध पावडर देखील घालायची आहे.वरील मिश्रणात २ कप माझा मॅंगो ड्रिंक मिसळून घ्या व ढवळा.मिश्रणाचा मऊ गोळा होईपर्यंत ते ढवळत राहा.एका ताटाला थोडेसे तूप लावून घ्या व त्यात मऊ गोळा थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.आता मिश्रण व्यवस्थित मळून घेऊया.मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घ्या.साच्यात थोडे पिस्त्याचे तुकडे घाला.वरील मिश्रणाचे लहान गोळे मोदकाच्या साच्यात घाला.तयार आहेत आपले बदाम माझा मोदक!
सोनाली राऊत यांनी केलेल्या स्वादिष्ट 'बदाम माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.