लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करण्याकडे हल्ली अधिक कल असतो. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.
चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांनी 'हलबाई माझा मोदक' तयार केले होते. तर विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी 'पनीर माझा मोदक' तयार केले होते. आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय असलेले सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी 'माझासोबत उकडीचे मोदक' करून दाखवले होते.
यामध्ये आज प्रतिभावान शेफ अर्चना आर्ते यांचा सहभाग आहे. अर्चना आर्ते या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ असून त्या आपल्या खाद्यपदार्थांमुळे जगभरात लोकप्रिय आहेत. अर्चना यांचं स्वत:चं यूट्यब चॅनल असून त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या प्रचंड आहे. तर मग पाहा अर्चना आर्ते यांची चविष्ट ,चवदार रसगुल्ला माझा मोदकांची रेसिपी.
रसगुल्ला मोदक
साहित्य:
दूध
१ टीस्पून व्हीनेगर
२०० ग्रॅम साखर
माझा मॅंगो ड्रिंक
२०० ग्रॅम मावा
पिस्ता
कृती:
१/२ लिटर उकळलेले दूध घ्या.
उकळलेल्या दुधात १ टीस्पून व्हिनेगर मिसळा.
गाळणीने दूध गाळून घ्या.
थंड पाण्याने धुऊन घ्या.
दूध गाळून घेताना सर्व पाणी काढून टाका.
झाले पनीर तयार!
पनीरमध्ये २०० ग्रॅम साखर मिसळा व पनीर मळून घ्या.
या पनीरचे लहान-लहान गोळे बनवा.
२०० ग्रॅम साखरेत तीन पट पाणी घेऊन मिश्रणास चांगली उकळी येऊ द्या.
तयार केलेले लहान गोळे या साखरेच्या पाकात सोडा.
गोळे ५-७ मिनिटांसाठी पाकात शिजवून घ्या व नंतर गॅस बंद करा.
साखरेच्या पाकातून गोळे बाहेर काढा व २ कप माझा ड्रिंकमध्ये २ तासासाठी भिजत ठेवा.
२०० ग्रॅम मावा घ्या. त्यात १ बार स्पून साखर घालून त्याचे गोळे बनवा.
आधी माझामध्ये भिजत घातलेले पनीरचे गोळे व माव्याचे गोळे आता एकत्र करा.
एकत्र केलेले गोळे मोदकाच्या साच्यात घाला.
सजावटीसाठी पिस्ता वापरा.
तयार आहेत आपले रसगुल्ला मोदक!
अर्चना आर्ते यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/TastySafar/
आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अॅमेझॉन इको प्लस (2nd generation).
रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.