गणपती बाप्पा मोरयाचा गजर, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाची भीती मागे सारत गर्दी टाळून सर्वांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. हे संकट लवकर दूर होऊ दे, तुझी सगळ्यांवर कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे सगळ्यांनी उत्साहाला थोडीशी मुरड घातली असली तरी बाप्पांच्या स्वागतात कुठेही कमतरता ठेवली नाही.
लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवण्यात येतो. घराघरांमध्ये मोदक तयार केले जातात. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत.
२१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. याआधी लोकप्रिय शेफ भारती म्हात्रे आणि मधुरा बाचल यांनी प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांनी 'हलबाई माझा मोदक' तयार केले होते. तर विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी 'पनीर माझा मोदक' तयार केले आहेत.
माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये आज सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांचा सहभाग असणार आहे. निलेश लिमये व्यवसायाने शेफ असून त्यांनी अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. रेस्टॉरंट सल्लागार आणि विविध मासिकांमध्येही लेखन केले आहे. 'सिंदबाद द शेफ' या टोपणनावाने ते प्रसिद्ध आहेत. चवदार चविष्ट जेवणापासून ते मोठ्या प्रमाणात बुफेपर्यंत विविध स्वयंपाकघर सेटअपमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. निलेश लिमये हे आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे आज ते प्रेक्षकांना कोणत्या मोदकांची मेजवानी देणार याबद्दल उत्सुकता आहे.
निलेश लिमये यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.
माझानं तुमच्यासाठी माझा मोदक स्पर्धादेखील आणली आहे. #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या रेसिपींचे व्हिडीओ lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अॅपल आयफोन ७ आणि त्यानंतरच्या पाच विजेत्यांना अॅमेझॉन इको डॉट (सेकंड जनरेशन) बक्षीस म्हणून मिळेल.
रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास माझा मोदक. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझा खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!
'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!